Multibagger Share Investment : शेअर बाजारातगुंतवणूक करणे धोक्याने भरलेले असते. पण जर शेअरची निवड योग्य असेल तर उत्तम परतावाही मिळू शकतो. असाच एक शेअर आहे तो म्हणजे आदित्य व्हिजनचा (Aditya Vision share) आहे. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या स्टॉकने 2022 मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. वर्ष-दर-वर्ष (YTD) कालावधीत स्टॉक सुमारे ₹630 वरून ₹1390 पर्यंत वाढला आहे.
पेनी स्टॉक असलेल्या आदित्य व्हिजन या कंपनीच्या शेअरची किंमत शेअर बाजारात ६ वर्षांमध्ये दुहेरी अंकांवरून चार आकडी संख्येवर गेली आहे. कोविड नंतर या शेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या शेअरच्या किंमतीत 20 रूपयांवरून 1390 रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. यादरम्यान या शेअरने 6900 टक्क्यांचे रिटर्न दिलेत.
… पण महिन्याभरात घसरणआदित्य व्हिजनच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात सुमारे 12 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या सहा महिन्यांत, हा स्मॉल-कॅप स्टॉक सुमारे ₹780 वरून ₹1390 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकच्या किंमतीत 75 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 2022 मध्ये, आदित्य व्हिजनच्या शेअरची किंमत ₹630 वरून ₹1390 वर पोहोचली. या कालावधीत भागधारकांना सुमारे 120 टक्के परतावा मिळाला आहे.
मल्टीबॅगर स्टॉकमध्ये दोन वर्षांत 5,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, हा स्मॉल-कॅप स्टॉक गेल्या तीन वर्षांत ₹20 ते ₹1390 च्या पातळीवर गेला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या ₹1 लाखांचे मूल्य आज ₹70 लाख झाले असते.