Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Share : ६₹ वरून ७४४₹ वर घेतली झेप, गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे झाले १.२० कोटी

Multibagger Share : ६₹ वरून ७४४₹ वर घेतली झेप, गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे झाले १.२० कोटी

Multibagger Share : शेअर मार्केटमध्ये जर मोठा परतावा हवा असेल तर तुमच्यामध्ये संयम असणं आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 02:24 PM2022-10-29T14:24:25+5:302022-10-29T14:24:51+5:30

Multibagger Share : शेअर मार्केटमध्ये जर मोठा परतावा हवा असेल तर तुमच्यामध्ये संयम असणं आवश्यक आहे.

Multibagger Share Leaps from 6 rupees to 744 rupees 1 Lakh of Investors became 1 20 Crore investment bse nse share stock market | Multibagger Share : ६₹ वरून ७४४₹ वर घेतली झेप, गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे झाले १.२० कोटी

Multibagger Share : ६₹ वरून ७४४₹ वर घेतली झेप, गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे झाले १.२० कोटी

Multibagger Share : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी जेवढा पैसा आवश्यक आहे तेवढाच संयमही आवश्यक आहे. अनेक वेळा असे दिसून येते की अनेक कंपन्या अल्पावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकत नाहीत. पण दीर्घकाळात याच कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज आम्ही अशाच एका कंपनीबद्दल सांगत आहोत ज्या कंपनीनं गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. तनला प्लॅटफॉर्मच्या (Tanla Platforms) एका शेअरची किंमत एकेकाळी ६.१० रुपये होती, ती आता ७४४.६० रुपयांपर्यंत वाढली आहे.

असे असले तरी मागील एक वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिले नाही. ज्या कालावधीत तनला प्लॅटफॉर्मच्या शेअरची किंमत 39 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर 2022 मध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 59.77 टक्क्यांची घसरण झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांना तब्बल 47 टक्क्यांचा फटका बसला आहे. दरम्यान, 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मात्र नफा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात तनला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सच्या किंमती 2212 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

26 ऑक्टोबर 2012 कंपनीच्या एका शेअरची किंमत 6.10 रुपये होती. गुरुवारी (27 ऑक्टोबर 2022) कंपनीच्या शेअरची किंमत 744.60 रुपयांवर बंद झाली. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी कंपनीत 1 लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराचा परतावा आज 1.20 कोटी रुपयांपर्यंत वाढला असता. म्हणजेच या समभागाने दीर्घकालीन स्थितीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2096 रुपये आहे. तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 584.50 रुपये आहे. ही कंपनी 2007 साली बीएसईवर लिस्ट झाली होती.

Web Title: Multibagger Share Leaps from 6 rupees to 744 rupees 1 Lakh of Investors became 1 20 Crore investment bse nse share stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.