Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Share : ‘या’ कंपनीला मिळाली अमेरिकेतून ऑर्डर, सलग ७ दिवस अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Share : ‘या’ कंपनीला मिळाली अमेरिकेतून ऑर्डर, सलग ७ दिवस अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock Return: पाहा कोणता आहे हा स्टॉक, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:11 PM2022-10-14T13:11:31+5:302022-10-14T13:12:19+5:30

Multibagger Stock Return: पाहा कोणता आहे हा स्टॉक, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Share Poojawestern Metaliks company got orders from America upper circuit for 7 consecutive days Investor huge profit bse nse investment | Multibagger Share : ‘या’ कंपनीला मिळाली अमेरिकेतून ऑर्डर, सलग ७ दिवस अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Share : ‘या’ कंपनीला मिळाली अमेरिकेतून ऑर्डर, सलग ७ दिवस अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock Return: पूजा वेस्टर्न मेटालिक्स (Poojawestern Metaliks shares) शेअर्स हे त्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहेत ज्यांनी कोविड नंतर जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत, BSE वरील हा सूचीबद्ध स्टॉक सुमारे 11 रुपयांवरून 59.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

दरम्यान, या स्टॉकमध्ये अद्यापही तेजी सुरू आहे. स्मॉल-कॅप कंपनीला नुकतीच अमेरिकेकडून निर्यात ऑर्डर मिळाली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि शुक्रवारी सकाळच्या कामकाजाच्या सत्रात स्टॉकमध्ये अपर सर्किट लागले. पूजावेस्टर्न मेटालिक्सचे शेअर शुक्रवारी तेजीसह उघडला आणि शेअर बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच शेअरमध्ये 5 टक्क्यांचे अपरच्या सर्किट लागले.

7 दिवसांपासून तेजी
या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गेल्या सात दिवसांपासून अपर सर्किट लागत आहे. 21 सप्टेंबरपासून हा शेअर अपट्रेंडमध्ये आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा शेअर 27.50 रुपयांवरून वाढून 59.25 रूपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीच्या शेअरसनं आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्क्यांचे रिटर्न दिले आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय?
स्मॉल-कॅप कंपनीचा जगभरात मजबूत ग्राहक आधार आहे आणि आखाती, मध्य पूर्व देशांना निर्यात केली जाते. आता युरोप आणि यूएसएपर्यंत ती पोहोचली आहे. याची गुजरातमध्ये सीएनसी मशीन टूल्स आणि अन्य मशीन उपकरणांसह अत्याधुनिक, अत्याधुनिक उत्पादन युनिट आहेत. यामध्ये गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन तंत्रज्ञान, नविन तंत्रज्ञान आणि एंटरप्राइझ उत्पादनांची श्रेणी आहे.

Web Title: Multibagger Share Poojawestern Metaliks company got orders from America upper circuit for 7 consecutive days Investor huge profit bse nse investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.