Join us  

Multibagger Share: TATA च्या या कंपनीनं गुंतवणूकदांरांना केलं मालामाल; फक्त 2 वर्षांत एक लाख 15 पटींनी वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:47 PM

टाटा कंपनीवर गेल्या कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.

टाटा कंपनीवर गेल्या कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. टाटा कंपनीची अनेक वर्षापासून प्रगती सुरू आहे. टाटा कंपनीने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव मोठे केले आहे. आज असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात टाटा हे नाव तुम्हाला दिसणार नाही, सर्व क्षेत्रात टाटा कंपनीने पाय पसरले आहेत. 

त्यामुळे गुंतवणूदारांचा टाटा कंपनीवर विश्वास आहे. टाटा समूहाच्या काही कंपन्या अशा आहेत ज्यांच्या नावापुढे टाटा नाही. पण या कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही देत ​​आहेत. टाटा नावाशी संबंध नसताना लोक सहसा अशा कंपन्यांकडे लक्ष देत नाहीत.

गुजरात निवडणूक ! ३० वर्षांतील सर्वांत मोठी मंदी; अस्वस्थ व्यापार अन् उद्योग...

1 जानेवारी 2021 रोजी टाटा समूहाची कंपनी 'ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंबलीज लिमिटेड'च्या शेअरची किंमत 26.70 रुपये होती. पण सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर रु.394 वर गेला. जानेवारी 2021 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती त्यांच्या पैशात आता 14 पटीने वाढ झाली आहे. टाटांच्या या कंपनीबद्दल लोकांना फारच कमी माहिती आहे. या टाटा कंपनीने दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 1400 टक्के परतावा दिला आहे. 

दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, गुंतवणूकदारांना 14 पटीहून अधिक परतावा मिळाला आहे. वर्षभरापूर्वी 1 डिसेंबरच्या आसपास हा शेअर 225 रुपये होता. यात सुमारे ७५ टक्के वाढ झाली आहे.

'ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्ली' टाटा मोटर्ससाठी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी शीट मेटल स्टॅम्पिंग, वेल्डेड असेंब्ली आणि मॉड्यूल तयार करते. याशिवाय, JCB, Tata Hitachi, MG Motors, General Motors India, Fiat India, Piaggio Vehicles या कंपन्यांना सेवा पुरवते.

टॅग्स :टाटाशेअर बाजार