Lokmat Money >शेअर बाजार > ३००००% ची तुफानी तेजी, १.२१ रुपयांवरुन ३६० रुपयांपार पोहोचला 'हा' मल्टिबॅगर शेअर

३००००% ची तुफानी तेजी, १.२१ रुपयांवरुन ३६० रुपयांपार पोहोचला 'हा' मल्टिबॅगर शेअर

टेक्सटाईल इंडस्ट्रीशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 03:02 PM2024-02-26T15:02:05+5:302024-02-26T15:03:17+5:30

टेक्सटाईल इंडस्ट्रीशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

Multibagger shares Indo Count Industries surge 30000 from Rs 1 21 to Rs 360 bse nse investment | ३००००% ची तुफानी तेजी, १.२१ रुपयांवरुन ३६० रुपयांपार पोहोचला 'हा' मल्टिबॅगर शेअर

३००००% ची तुफानी तेजी, १.२१ रुपयांवरुन ३६० रुपयांपार पोहोचला 'हा' मल्टिबॅगर शेअर

इंडो काउंट इंडस्ट्रीज (Indo Count Industries) या टेक्सटाईल इंडस्ट्रीशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवारी 11 टक्क्यांहून अधिक वाढून 363.70 रुपयांवर पोहोचले. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 30,000 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.21 रुपयांवरून 360 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सोमवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला.
 

शेअर्समध्ये 30000% ची तेजी
 

इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 16 मार्च 2012 रोजी 1.21 रुपयांवर होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 363.70 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 30000 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं 16 मार्च 2012 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 3 कोटी रुपये झालं असतं.
 

4 वर्षांत 1400 टक्क्यांची तेजी 
 

कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 23.90 रुपयांवर होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 363.70 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 4 वर्षांत इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 1400% पेक्षा जास्त वधारले आहेत. गेल्या एका वर्षात इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स सुमारे 183% वाढले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 128.40 रुपयांवरून 363.70 रुपयांपर्यंत वाढले. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स 27% पेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 101.25 रुपये आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Multibagger shares Indo Count Industries surge 30000 from Rs 1 21 to Rs 360 bse nse investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.