Multibagger Stock : मल्टीबॅगर स्टॉक्स हे असे स्टॉक आहेत ज्याद्वारे तुम्ही कमी कालावधीत प्रचंड परतावा मिळवू शकता. यामुळेच बहुतेक गुंतवणूकदार अशा शेअर्सचा शोध घेतात. परंतु यातील धोका देखील खूप जास्त आहे. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही मर्क्युरी मेटलवर (Mercury Metals) लक्ष ठेवू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत हा स्टॉक १९० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या शुक्रवारीही या शेअरमध्ये ५ टक्क्यांची तेजी दिसून आली.
मर्क्युरी मेटल्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात १० टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या ६ महिन्यांत हा शेअर १९० टक्क्यांनी वाढलाय. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दीर्घ मुदतीत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अविश्वसनीय नफा दिला. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना १५८० टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, गेल्या ३ वर्षांत या स्टॉकमध्ये ४२३८ टक्के वाढ झाली.
३ वर्षांत ४३ पट वाढ
गेल्या तीन वर्षांत मर्क्युरी मेटल्सच्या गुंतवणूकदारांचा पैसा ४३ पट वाढलाय. एप्रिल २०२० मध्ये, त्यांच्या एका शेअरची किंमत फक्त ०.३६ रुपये होती. जी आता १५.६२ रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही ३ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ३ लाख रुपये गुंतवले असते तर तुमच्या १ लाखांचे मूल्य आज ४३ लाख झालं असतं.
(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)