Join us

100 रुपयांचा 'हा' शेअर 1000 वर पोहोचला; 3 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 2:55 PM

Multibagger Stock 2023: कधीकधी एखादा शेअर गुंतवणूकदारांना एका झटक्यात मालामाल करतो. जाणून घ्या या शेअरबद्दल...

Multibagger Stock 2023: शेअर मार्केटची गुंतवणूक जोखमीची असते, पण कधी-कधी एखाद्या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो 100 रुपयांवरुन 1000 रुपयापर्यंत वाढला. या शेअरने फक्त 3 वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहे.

आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो संरक्षण क्षेत्रातील शेअर आहे. या शेअरने 3 वर्षांच्या कालावधीत 823 टक्के रिटर्न्स दिले. मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या कंपनीचे नाव प्रीमियर एक्सप्लोसिव्ह लि.(Premier Explosives Ltd) आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, त्यांना शेअरने मालामाल केले. या शेअरची किंमत 108 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढली.

1 लाखाचे झाले 9 लाख प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडच्या शेअरची किंमत 31 जुलै 2020 रोजी 108.55 रुपये होती. तर, आज म्हणजेच गुरुवारी कंपनीचा शेअर 1002.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्या व्यक्तीला 9 लाखांपेक्षा जास्त नफा झाला असता.

कंपनीचे मार्केट कॅप किती वाढले?बीएसईवर 5107 शेअर्समध्ये एकूण 50.83 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1078 कोटी रुपये झाले. जर आपण स्टॉकच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईबद्दल बोललो, तर जून तिमाहीत 8.21 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 1.26 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

(डिस्केमर: आम्ही फक्त स्टॉकच्या कामगिरीबद्दल माहिती देत असून, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक