Lokmat Money >शेअर बाजार > १६ रुपयांच्या मल्टीबॅगर शेअरने केलं श्रीमंत! पुन्हा लागलं अपर सर्किट, वर्षात २८४ टक्के परतावा

१६ रुपयांच्या मल्टीबॅगर शेअरने केलं श्रीमंत! पुन्हा लागलं अपर सर्किट, वर्षात २८४ टक्के परतावा

Multibagger Stock : हा मल्टीबॅगर स्टॉक BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे. या शेअरने मागील एका वर्षात २८४ टक्के परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:21 PM2024-11-27T17:21:06+5:302024-11-27T17:21:37+5:30

Multibagger Stock : हा मल्टीबॅगर स्टॉक BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे. या शेअरने मागील एका वर्षात २८४ टक्के परतावा दिला आहे.

multibagger stock again hit upper circuit 16 rs share give return of 284 in 1 year | १६ रुपयांच्या मल्टीबॅगर शेअरने केलं श्रीमंत! पुन्हा लागलं अपर सर्किट, वर्षात २८४ टक्के परतावा

१६ रुपयांच्या मल्टीबॅगर शेअरने केलं श्रीमंत! पुन्हा लागलं अपर सर्किट, वर्षात २८४ टक्के परतावा

Multibagger Stock : तुम्ही शेअर मार्केटमधील घोटाळ्यावर आधारीत स्कॅम १९९२ पाहिली आहे का? यामध्ये हर्षद मेहता यांचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तोंडी एक संवाद होता. 'रिस्क है तो इश्क है'. हा डायलॉग नंतर तुफान गाजला. आजही शेअर मार्केटमधील गुंतवणूक करणारे लोक हे बोलताना पाहायला मिळतात. हे काहीअंशी सत्यही आहे. शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा पैसा आहे. मात्र, तो मिळवण्यासाठी तुम्हाला धोकाही तेवढाच मोठा पत्करावा लागतो. इथं रात्रीत श्रीमंत करणारे अनेक शेअर्स आहेत. तसेच राजाचा रंक करणारेही कमी नाहीत. आता झटपट श्रीमंत होण्याचा विषय निघालाच आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशा शेअरची माहिती सांगणार आहोत. ज्याने एका वर्षात तब्बल २८४ टक्के परतावा दिला आहे. धक्कादायक म्हणजे या शेअरची अवघी १६ रुपये आहे. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक पुन्हा अपर सर्किटला जायला सुरुवात केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी अपर सर्किट बसल्यानंतरही शेअरची किंमत १६.७ रुपये आहे.

हा कोणता मल्टीबॅगर स्टॉक आहे?
या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव SAB Events & Governance Now Media Ltd, असे आहे. हा स्टॉक बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे. १७.३ कोटी मार्केट कॅप असलेल्या या शेअरचे फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. तर स्टॉकचा आरओसीई मायनस २३.३ टक्के आहे. तर, शेअरची बुक व्हॅल्यू मायनस १.८० रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७.७ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांक २.२५ रुपये आहे.

काय करते कंपनी?
सॅब इव्हेंट्स अँड गव्हर्नन्स नाउ मीडिया लिमिटेड डिजिटल मीडिया वेबसाइट्स आणि MICE (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झिबिशन) च्या व्यवसायात गुंतलेली आहे.

गुंतवणूक करावी की नाही?
अशा कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार आणि अशा पेनी स्टॉकची (Penny stock) माहिती असलेल्या अनुभवी आणि जाणकार आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्यावा. कारण, हे शेअर्स कसे व्यवहार करतील याची काहीही शाश्वती नाही. 'चला तो चाँद तक, नहीं तो शाम तक' अशी या स्टॉक्सची अवस्था आहे.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: multibagger stock again hit upper circuit 16 rs share give return of 284 in 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.