Join us  

Multibagger Stock in Share Market: मोजून दमाल! १ लाखाचे झाले ११.३५ कोटी; ‘या’ कंपनीने दिले छप्परफाड रिटर्न्स; तुम्ही घेतलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 4:48 PM

Multibagger Stock in Share Market: ४ रुपयांचा शेअर ५,९०० रुपयांवर गेला असून, कंपनीने कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे.

Multibagger Stock in Share Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार येताना दिसत आहे. अनेक बड्या कंपन्यांचे शेअर घसरताना दिसत आहेत.  तर काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहेत. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या मल्टिबॅगर यादीत समाविष्ट होतात, यापैकी एका कंपनीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ११ कोटी झाल्याचे सांगितले जात आहे. 

शेअर बाजारात गुंतवणूक करणे जितके धोकादायक आहे, तितकेच ते फायदा मिळवण्याचे एक चांगले साधन आहे. योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास अगदी छोटी गुंतवणूकही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी छोट्या गुंतवणुकीचे कोट्यवधीत रूपांतर केले आहे. बजाज ग्रुपची कंपनी असलेल्या बजाज फायनान्स स्टॉकच्या शेअर्सने २० वर्षांत १००००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

आतापर्यंतचे सर्वाधिक २.९६ कोटींचे नवीन कर्ज घेतले

३१ मार्च २०२३ पर्यंत बजाज फायनान्सची ग्राहक फ्रँचायझी ३१ लाखांनी वाढून ६.९१ कोटी झाली आहे. कंपनीने ४ एप्रिल रोजी दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ग्राहक फ्रेंचायझीसाठी घेतलेल्या कर्जामध्ये १.१५ कोटी एवढी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत ६३ लाखांच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढून ७६ लाख झाली होती. बजाज फायनान्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक २.९६ कोटींचे नवीन कर्ज घेतले आहे.

१ लाख रुपयांचे ११ कोटी झाले

१३ मार्च २००९ रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात ५.०३ रुपयांवर होते. तर आताच्या घडीला बजाज फायनान्सचे शेअर ५,९५१ रुपयांवर व्यवहार करत आहेत.  अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने १३ मार्च २००९ रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर हे पैसे सध्या ११.३५ कोटी रुपये झाले असते. अशा प्रकारे कंपनीच्या शेअर्सनी गेल्या १४ वर्षात ११३४७८ टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

४ रुपयाचा शेअर गेला ५ हजार ९०० रुपयांवर

ऑगस्ट २००२ मध्ये बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत फक्त ४ रुपये होती. तर गुरुवारी ६ एप्रिल २०२३ रोजी या शेअरची किंमत ५,९५१ वर पोहोचली. या दीर्घ कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना १०३,३९५.६५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑगस्ट २००२ मध्ये बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर हे पैसे सध्या ११ कोटी रुपयांच्या वर गेले असते.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक