Multibagger Stock Bajaj Finance: शेअर बाजाराताली गुंतवणूक जरी जोखमीची असली तरी गुंतवणूकदारांचं नशीब कधी फळफळेल ते काही सांगता येत नाही. अवघ्या साडेचार रुपयांच्या स्टॉकनं असाच जबरदस्त परतावा दिला आहे की गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. २० वर्षात या शेअरनं १ लाख रुपयांचे १० कोटीहून अधिक उलाढाल केली आहे आणि लॉन्ग टर्म गुंतवणुकीवर विश्वास ठेवणारे गुंतवणूकदार कोट्यधीस झाले आहेत.
लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांची दिवाळी
स्टॉक मार्केटमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी अनेक शेअर मल्टीबॅगर रिटर्न्स देणारे सिद्ध झाले आहेत. या लिस्टमध्ये बजाज फायनान्सचाही शेअर सामील आहे. ज्यानं गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. सध्या हा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या तुलनेत खूप निगेटीव्ह ट्रेड करत आहे. पण गेल्या २० वर्षांची कामगिरी पाहायची झाली तर या कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून जवळपास १,०२,००० टक्के परतावा गुंतवणूकदारांनी कमावला आहे.
२००२ साली होती इतकी किंमत
वीस वर्षांपूर्वी २३ ऑगस्ट २००२ रोजी बजाज फायनान्सच्या शेअरचा भाव अवघा ४.६१ रुपये इतका होता. पण बुधवारी हाच दर ५,८८०.५० रुपये इतक्या किमतीवर बंद झाला. याआधी तर या शेअरनं ८,०४५ रुपयांची पातळीही गाठली होती. २००२ सालच्या हिशोबानं पाहायचं झालं तर जर एखाद्या गुंतवणुकदारानं त्यावेळी बजाज फायनान्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत १० कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)