कोरोनानंतर छप्परफाड परतावा देणाऱ्या शअर्सपैकीच एक शेअर म्हणजे, बीसीएल इंडस्ट्रीजचा शेअर. एफएमसीजी, रियल इस्टेट आणि केमिकल सेगमेन्टमध्ये काम करणाऱ्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या मल्टीबॅगर स्मॉल कॅप कंपनीचा शेअर कोरोना काळानंतर 40 वरून 490 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्क्याहून अधिकचा परतावा दिला आहे.
शेअरमध्ये तेजीची शक्यता -या शेअरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मनुसार, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स या शेअरला 925 रुपयांच्या लॉन्ग टर्म टार्गेटसह आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. कंपनीचा शेअर सध्या 490 रुपयांवर ट्रेड करत आहे. याचाच अर्थ हा शेअरही आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्क्यांहून अधिकचा परतावा देऊ शकतो.
1,180.57 कोटी बाजार भांडवल -बीसीएल इंडस्ट्रीजचा शेअर मंगळवारी दुपारी बीएसईवर 0.50 टक्के अथवा 2.45 रुपयांच्या घसरणीसह 487.95 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. व्यवहारादरम्यान हा शेअर जास्तीत जास्त 498.95 रुपयांपर्यंत कमान 483.10 रुपयांपर्यंत गेला. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 536.35 रुपये तर निचांक 276.15 रुपये एवढा आहे. तसेच बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 1,180.57 कोटी रुपये होते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)