Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरने एक लाखाचे केले 5 कोटी, तुम्ही घेतला का..?

Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरने एक लाखाचे केले 5 कोटी, तुम्ही घेतला का..?

Share Market: या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 03:44 PM2022-10-30T15:44:25+5:302022-10-30T15:45:08+5:30

Share Market: या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा परतावा दिला आहे.

Multibagger Stock: Bharat Electronics Ltd. stocks turned 1 lakh into 5 crores, did you take it..? | Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरने एक लाखाचे केले 5 कोटी, तुम्ही घेतला का..?

Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरने एक लाखाचे केले 5 कोटी, तुम्ही घेतला का..?

Multibagger Stock: शेअर बाजारातगुंतवणूक करणे जोखमीचे काम आहे. पण, कधी-कधी गुंतवणूकदारांना असा शेअर मिळतो, ज्यातून त्यांची छपपडफाड कमाई होते. अशाप्रकारचे मल्टीबॅगर स्टॉक मिळण्यासाठी नशीब लागते. अशा काही मल्टीबॅगर स्टॉक्सने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये एक मोठे नाव म्हणजे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Ltd.).

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना कैक पटीने परतावा दिला आहे. या स्टॉकने किती रिटर्न्स दिले? याचा अंदाज लावायचा झाल्यास, या स्टॉकने एक लाख रुपयांचे कोट्यवधी रुपये केले आहेत. विशेष म्हणजे, एकेकाळी या शेअरची किंमत 1 रुपयांपेक्षाही कमी होती. मात्र, आता या शेअरची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे.

1 जानेवारी 1999 रोजी NSE वर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL शेअर किंमत) च्या शेअरची किंमत 22 पैसे होती. तर, 5 फेब्रुवारी 1999 रोजी या शेअरची किंमत 18 पैसे झाली. यानंतर 4 जून 1999 रोजी या शेअरने पुन्हा दोन पैशांची वाढ नोंदवली आणि 20 पैसे झाली. हळूहळू या स्टॉकमध्ये वाढ होत गेली आणि फेब्रुवारी 2000 मध्ये या स्टॉकची किंमत 1 रुपये झाली.

नंतर, 2005 मध्ये प्रथमच शेअरची किंमत 10 रुपयांच्या पुढे गेली. मात्र, आता हा शेअर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांक 114.65 रुपये इतका नोंदवला गेला आहे. 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकची किंमत 105.30 रुपये होती. दरम्यान, 1999 मध्ये एखाद्याने या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर त्या गुंतवणूकदाराला 5 लाख शेअर्स मिळाले असते. म्हणजेच, 100 रुपयांनुसार पाच लाख शेअर्सची किंमत, आता पाच कोटी रुपये झाली असती.

(डिस्कलेमर : आम्ही इथे तुम्हाला गुंतवणूकीचा सल्ला देत नाही आहोत. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जानकारांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Multibagger Stock: Bharat Electronics Ltd. stocks turned 1 lakh into 5 crores, did you take it..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.