Join us

Multibagger Stock: मस्तच! 25 पैशांच्या 'या' शेअरने बनवले करोडपती, 3500 रुपयांचे झाले 1 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 5:36 PM

मोठ्या परताव्या बाबतीत मल्टीबॅगर स्टॉक्स हे गुंतवणूकदारांचे नशीब बदलणारे ठरतात. शेअर मार्केटमध्ये अभ्यास करुन गुंतवणूक केली तर त्याचा परतावा जास्त होऊ शकतो.

मोठ्या परताव्या बाबतीत मल्टीबॅगर स्टॉक्स हे गुंतवणूकदारांचे नशीब बदलणारे ठरतात. शेअर मार्केटमध्ये अभ्यास करुन गुंतवणूक केली तर त्याचा परतावा जास्त होऊ शकतो. कॅपलिन पॉइंट लॅबच्या शेअर्सने सध्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.फक्त 3500 रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत. या समभागाने दीर्घ मुदतीत मोठा परतावा दिला आहे.

CAPLIN POINT LAB चे शेअर्स 21 फेब्रुवारी 2003 रोजी फक्त 25 पैसे या नाममात्र किमतीत उपलब्ध होते, पण आता त्याची किंमत 726 रुपयांवर पोहोचली आहे. सुमारे 20 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 2900 पट परतावा देण्याचे काम केले आहे. गुंतवणूकदाराने दोन दशकांपूर्वी या शेअरवर अवलंबून राहून फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक केली असती, आता ती गुंतवणूक 1 कोटी रुपयांपर्यंत वाढलेली असेल.

Todays Gold-Silver Rate: घ्यायचं तर आताच घ्या; सोनं अन् चांदीचा भाव घसरला; पटापट चेक करा, लेटेस्ट रेट!

कॅपलिन पॉइंट लॅब ही फार्मा कंपनी आहे, याचा व्यवसाय आफ्रिकन देशांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी Ointments, Cream बनवते. या फार्मास्युटिकल कंपनीचा व्यवसाय 1990 मध्ये सुरू झाला आणि त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. या कंपनीची सूची 1994 मध्ये भारतीय शेअर बाजारात झाली. त्याच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जास्त प्रतिसाद दिला आहे.

कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर करार ठरले आहेत. 2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. 6 जानेवारी 2022 रोजी त्याची किंमत 888.45 रुपये या वर्षीच्या उच्चांकावर पोहोचली होती. त्याच्या स्टॉकचे मूल्य घसरले आहे. मे 2022 मध्ये, त्याच्या शेअरची किंमत 600 रुपयांच्या पातळीवर कोसळली होती, पण आता पुन्हा ते स्थिर होण्यास सुरुवात झाली आहे.आता पुन्हा 700 पार करून 726 रुपयांवर आला आहे.

गेल्या पाच वर्षातील चढ-उतार पाहिल्यास, 22 डिसेंबर 2017 रोजी कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीचे शेअर्स 638.25 रुपयांच्या पातळीवर होते. 28 डिसेंबर 2018 रोजी तो 382 रुपयांपर्यंत खाली आला. 20 डिसेंबर 2019 रोजी 313.20 रुपयांवर घसरला आहे. 20 मार्च 2022 रोजी त्याची किंमत फक्त 238 रुपये होती. यानंतर, कंपनीच्या शेअर्सने मोठी झेप घेतली आहे. 9 सप्टेंबर 2021 रोजी ते 934 रुपयांपर्यंत खाली आली आहे. 

टॅग्स :व्यवसाय