प्रिंटर तयार करणारी कंपनी कंट्रोल प्रिंटने (Control Print) आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आपल्याला चांगला नफा मिळवायचा असेल, तर आपण दीर्घ मुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी. कंट्रोल प्रिंटने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात कोट्यधीश बनवले आहे. या कंपनीच्या शेअरने शुक्रवारी विक्रमी उच्चांक गाठला आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. कंट्रोल प्रिंटचा शेअर शुक्रवारी 1.81 टक्क्यांनी वाढून 580.00 रुपयांवर बंद झाला.
पाच रुपयांवरून 590 वर पोहोचला शेअर -
कंट्रोल प्रिंटचा शेअर 23 मार्च 2001 रोजी केवळ 4.57 रुपयांवर होते. पण आता हा शेअर 580 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान 597 रुपयांवर पोहोचला होता. अर्थात, या शेअरने गेल्या 22 वर्षांत तब्बल 12860 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. या तेजीसह, कंट्रोल प्रिंटच्या स्टॉकने 22 वर्षांत 78,000 रुपयांचे 1 कोटी रुपयांहून अधिक केले आहेत.
पुढेही राहू शकते तेजी -
गेल्या वर्षी 28 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांतील 376 रुपये या निचांकी पातळीवर होता. यानंतर हा पुढील 5 महिन्यांत 59 टक्क्यांची उसळी घेऊन 5 मे 2023 रोजी 597 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ब्रोकरेज फर्म्सच्या मते हा स्टॉक सध्याच्या पातळीवरून आता आणखी 17 टक्क्यांनी वर जाऊ शकतो.
स्टॉकच्या सद्यस्थितीसंदर्भात बोलायचे झाल्यास गेल्या पाच दिवसांत कंट्रोल प्रिंटचा शेअर 83 टक्कयांनी वाढला आहे. गेल्या महिनाभरात या स्टॉकने 7.62 टक्क्यांची तेजी आली आहे. तसेच गेल्या सहा मिहन्यात हा शेअर 34 टक्क्यांनी वधारला आहे. तसेच गेल्या वर्षभारात 32 टक्क्यांनी वधारला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)