Join us  

बम्पर रिटर्न! ₹15 च्या या शेअरनं दिलाय 11500 टक्क्यांचा परतावा; एक्सपर्ट म्हणतायत- ₹2280 पर्यंत जाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 3:45 PM

या शेअरने केवळ 12 वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

स्पेशॅलिटी केमिकल कंपनी दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये मंगळवारी चढ-उतार दिसून आला असला तरी या शेअरसंदर्भात एक्सपर्ट बुलिश आहेत. हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये जबरदस्त नफा देऊ शकतो, असे ब्रोकरेज चे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरने केवळ 12 वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

ब्रोकरेज रेलिगेअर ब्रोकिंगने दीपक नायट्रेटच्या शेअरसाठी टारगेट प्राइस 2280 रुपये दिली आहे. याच बरोबर, खरेदीची रेटिंगही कायम ठेवली आहे. आता या शेअरची किंमत 2070 रुपयांवर आहे. अशा प्रकारे, या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपयांहून अधिकचा फायदा होण्याची शक्यता आहे.

कंपनीनं केली आहे मोठी डील -दीपक नाइटराइटने गुजरात सरकारसोबत नुकताच 5000 कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे. याअंतर्गत पुढील चार वर्षांत जवळपास 5,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आहे.  याच्या माध्यमातून स्पेशॅलिटी केमिकल मध्ये दीपक केम टेकचा दबदबा वाढेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या गुंतवणुकीमुळे जवळपास 1500 प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची शक्यता आहे. तसेच, भारताचा आयात खर्चही कमी होईल.

मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर - दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत 2011 मध्ये केवळ 15 रुपये होती. आता या शेअरची किंमत 2000 रुपयांवर आहे. अशा प्रकारे या शेअरने 12 वर्षांत जवळपास 11500 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2,355.55 रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक