Multibagger Stock: 2023 वर्ष सुरू होऊन अवघे काही दिवसचं झाले आहेत. यातच एका मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारां फक्त 11 दिवसात डबल रिटर्न्स दिले आहेत. श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट (Shriram Asset Management) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
5 दिवसात कितीने वाढ झाली?
गेल्या 5 दिवसांत स्टॉक 9.21 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. हा शेअर 5 ट्रेडिंग दिवसात 17.65 रुपयांनी वाढला आहे. या वाढीनंतर शेअरची किंमत 209.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार होत आहे.
11 दिवसात 100% पेक्षा जास्त रिटर्न्स
1 तारखेपासून या शेअरमध्ये 11 दिवस चांगली तेजी पाहायला मिळाली आहेय या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. या काळात शेअर्सने गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा दिला आहे.
एका महीन्यात स्टॉक 91.55 ने वाढला
गेल्या एका महिन्याचा चार्ट पाहिला तर या काळात शेअरमध्ये 77.72 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. 19 डिसेंबरला कंपनीचा शेअर 117 रुपयांच्या पातळीवर होता. एका महिन्यात हा शेअर 91.55 रुपयांवर आला आहे.
YTD वेळेतही तेजी पाहायला मिळाली
YTD वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, 2 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर 110.15 रुपयांच्या पातळीवर होता. या कालावधीत शेअरची किंमत 90.06 टक्क्यांनी वाढली आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 231.90 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 93.00 रुपये आहे.