Multibagger Stock : शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची असते. पण, कधी-कधी असा एखादा शेअर हाती लागतो, जो गुतंवणूकदारांना मालामाल करतो. शेअर बाजारातगुंतवणूक करणारे अशाच शेअर्सच्या शोधात असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. हा पेनी स्टॉक सरकारी कंपनी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IFCI) चा आहे, ज्याने अवघ्या 4 वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
या कंपनीच्या शेअरने चार वर्षांपूर्वी 3 रुपयांपासून प्रवास सुरू केला आणि आज हा 40 रुपयांवर पोहोचला आहे. भविष्यातही याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. IFCI स्टॉक लवकरच 50 चा टप्पा ओलांडेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, IFCI ही वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली आर्थिक विकास संस्था आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर लगेचच त्याची स्थापना झाली. यात 7 उपकंपनी आणि एक सहयोगी कंपनी देखील आहे. या कंपनीने नोव्हेंबर 1994 मध्येच शेअर बाजारात प्रवेश केला होता, पण आता काही काळापासून या शेअरने वेग पकडला आहे.
1 लाखाचे झाले 3.5 लाख
कोरोनानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आजही, म्हणजेच 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता या शेअरमध्ये 1.25 टक्क्यांची वाढ दिसून आली. सध्या हा शेअर NSE वर 40.85 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 9 रुपयांवरुन 40 रुपयांपर्यंत वाढली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आता त्याला 350 टक्के नफा झाला असेल. म्हणजेच, त्याला एकूण रक्कम 3.5 लाख रुपये मिळतील.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)