Join us  

Multibagger Stock : १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले १.०८ कोटी, फेविकॉल तयार करणाऱ्या कंपनीचा तुफान परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:14 AM

मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) त्यांच्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देतात.

Multibagger Stock: मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) त्यांच्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देतात. असाच एक स्टॉक पिडीलाइट इंडस्ट्रीजचा (Pidilite Industries) आहे, ज्याने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. फेव्हिकॉलचं उत्पादन करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स आगामी काळात आणखी वाढू शकतात, असं बाजारातील जाणकारांचे म्हणणं आहे. हा स्टॉक सध्याच्या पातळीपेक्षा २१ टक्क्यांनी अधिक वर जाऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये ०.१२ टक्क्यांनी घसरून २,३६५.३० रुपयांवर बंद झाला.

पिडीलाइट इंडस्ट्रीजचं मार्केट कॅपटलायझेशन १,२०,१९३.४४ कोटी रुपये आहे. हा कंपनी असा एक विभाग आहे, ज्यामध्ये त्यांच्यासमोर स्पर्धा कमी आहे. त्यामुळे त्याची वाढ जास्त दिसून येते. गेल्या पाच दिवसांत शेअर १.१७ टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात शेअरच्या किंमतीत ३.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत शेअरच्या किंमतीत १५.५९ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, एका वर्षात स्टॉक ३.७१ टक्क्यांनी घसरला आहे.

१ लाखांचे झाले १.०८ कोटी१८ मार्च २००५ रोजी पिडीलाइटच्या शेअरची किंमत २१.७९ रुपये होती. त्याच वेळी, आता या स्टॉकनं २३०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याचा अर्थ पिडीलाइटच्या शेअर्सनं १८ वर्षांत १०८ पट परतावा दिला आहे. मार्च २००५ मध्ये जर एखाद्यानं १ लाख रुपये Pidilite कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज १.०८ कोटी रुपये झालं असतं. दीर्घ मुदतीव्यतिरिक्त या शेअरनं अल्पावधीत चांगला परतावा दिला आहे. १७ जून २०२२ रोजी शेअर १९८८.६० रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक