Join us  

Multibagger Stock : १२ रुपयांवर आला होता IPO, आता शेअर ५०० पार; १.२० लाखांचे झाले २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 3:58 PM

Multibagger Stock : कंपनीच्या या शेअरची किंमत १२ रुपयांवरून वाढून आता ५०० रूपयांवर पोहोचले आहेत.

Multibagger Stock : एका आयपीओनं अवघ्या काही वर्षांतच गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. लँसर कंटेनर लाईन्स (Lancer Container Lines) असं या शेअरचं नाव आहे. लॉजिस्टिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा आयपीओ मार्च २०१६ मध्ये १२ रुपयांच्या फिक्स्ड प्राईजवर आला होता. कंपनीचा पब्लिक इश्यू बीएसई एसएमई एक्सचेंजवर लिस्ट झाला होता. त्यानंतर गेल्या सहा वर्षांमध्ये कंपनीच्या शेअरनं जबरदस्त रिटर्न दिले आहेत. कंपनीचा शेअर १२ रुपयांवरुन वाढून ५०० रुपयांच्या पार पोहोचला आहे. लँसर कंटेनर लाइन्सचा शेअर ७ नोव्हेंबर २०२२ मध्ये ५२ आठवड्यांच्या ऑल टाईम हाय ५०८ रुपयांवर पोहोचला होता. लिस्टिंगनंतर या कंपनीनं दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.

लँसर कंटेनर लाईन्सचे शेअर २०१६ मध्ये १२ रुपयांच्या फिक्स्ड प्राईजवर आले होते आणि १२.६० रुपयांवर लिस्ट झाले होते. कंपनीच्या शेअर्सनं गेल्या सहा महिन्यांमध्ये २ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं ३ जानेवारी २०१८ आणि १३ ऑक्टोबर २०२१ रोजी एक्स बोनसवर होते. कंपनीनं २०१८ मध्ये ३:५ रेशोमध्ये आणि २०२१ मध्ये ३:१ रेशोमध्ये बोनस शेअर्स दिले होते. आयपीओमध्ये मिळालेले १०००० शेअर्स ३:५च्या बोनस नंतर १६००० झाले. कंपनीनं २०२१ मध्ये २:१ च्या रेशोमध्ये बोनस दिले होता. अशातच हे शेअर्स १६००० वरुन ४८००० हजारांवर पोहोचले.

१.२० लाखांचे झाले २.४३ कोटीया कंपनीचे शेअर ७ नोव्हेंबर २०२२ रोजी ५०८ रुपयांच्या स्तरावर पोहोचले होते. अशातच ४८ हजार शेअर्सचं एकूण मूल्य २.४३ कोटी रूपये झालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये १० हजार शेअर्ससाठी १.२० लाख रुपयांचा खर्च करावा लागला होता. कंपनीच्या ५२ आठवड्यांची लो लेव्हल १३६.५० रुपये आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक