Join us  

Multibagger Stock : 98 पैशांच्या शेअरची कमाल, एका वर्षात 25 पट वाढला पैसा; जाणून घ्या काय आहे बिझनेस 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 2:37 PM

या शेअरच्या शेअर बाजारातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत सातत्याने वाढताना दिसत आहे.

शेअर बाजार हा अत्यंत अस्थिर असतो. मात्रे असे असतानाही, यात एखाद दुसरा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवतो. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे Mercury Ev-Tech. या शेअरने अत्यंत कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. या शेअरची किंमत केवळ एका वर्षात 98 पैशांवरून 26 पैशांवर पोहोचली आहे. या शेअरच्या शेअर बाजारातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत सातत्याने वाढताना दिसत आहे.

गुंतवणूकदारांना मिळाला 25 पट परतावा -मरक्युरी ईव्ही-टेक लिमिटेड (Mercury Ev-Tech) देशातील इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर्सपासून ते कार निर्मितीचेही काम करते. इलेक्ट्रिक व्हेइकलची एक मोठी रेंज बनविण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनी आपली सब्सिडरी फर्म PowerMetz Energy Private Limited च्या माध्यमाने 2W आणि 3W लिथियम-आयर्न बॅटरीच्या निर्मितीचे कामही करत आहे.

एका वर्षात किती परतावा दिला?-या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीशी संबंधित कंपनीच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 2,579.59 टक्के एवढा बम्पर परतावा दिला आहे. अर्थात, ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, ती आता 25 पटीहून अधिक झाली असेल. गेल्या वर्षी 20 जून 2022 रोजी मर्क्युरी इव्ह-टेकच्या एका शेअरची किंमत 0.98 रुपये एवढी होती. ती आता बातमी लिहेपर्यंत 26.26 रुपयांवर पोहोचली आहे. शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा शेअर अपर सर्किटला लागला.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार