Multibagger Stock News: जॉन कॉकेरिल इंडिया लिमिटेडच्या (John Cockerill India Limited) शेअरमध्ये आज शेअर बाजारात १८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या मल्टीबॅगर शेअरची किंमत ५४६२.६० रुपयांच्या पातळीवर उघडली. कंपनीचा शेअर ६४४३ रुपयांच्या दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. गेल्या दोन दिवसांत शेअरचा भाव ४२ टक्क्यांहून अधिक वधारलाय.
५ जून रोजी कंपनीच्या शेअरची किंमत ३२५० रुपयांच्या पातळीवर होती. गेल्या १३ दिवसांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झालेत.
मिळालेला डिविडेंड
६ मे रोजी कंपनीचा एक्स-डिव्हिडंड ट्रेड होती. त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना कंपनीच्या वतीने प्रति शेअर ७ रुपये लाभांश देण्यात आला. कंपनीनं पहिल्यांदा ६ ऑगस्ट २००१ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड केली होती. तेव्हा प्रति शेअर २ रुपये लाभांश मिळाला. त्यानंतर ६ वर्षांनी कंपनीनं ९ रुपयांचा लाभांश दिला. त्यानंतर २०१२ पर्यंत कंपनीनं सातत्याने लाभांश दिला.
कामगिरी कशी?
गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी १ वर्ष शेअर होल्ड केलाय, त्यांना १२० टक्के नफा झालाय. म्हणजेच या काळात पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २३७४ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २९६५.७५ कोटी रुपये आहे. कंपनीत प्रवर्तकांचा ७५ टक्के हिस्सा आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)