Join us  

एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 5:49 PM

Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले.

Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळवून दिला आहे. त्यापैकी काहींनी दीर्घकालीन, तर काहींनी अल्पावधीत गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. असाच एक शेअर त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine Share) चा आहे, जो अवघ्या तीन वर्षांत 97 रुपयांवरुन 564 रुपयांवर पोहोचला. ज्यांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली त्यांना मिळालेल्या मल्टीबॅगर रिटर्न्सने रु. 1 लाखाचे रूपांतर 5 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.

तीन वर्षांत 474% परतावाअल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या त्रिवेणी टर्बाइनच्या शेअर्सनी गेल्या तीन वर्षांत तब्बल 474 टक्के परतावा दिला आहे. 14 मे 2021 रोजी या त्रिवेणी टर्बाइन लिमिटेडच्या शेअरची किंमत 96.65 रुपये होती, जी 4 मे 2024 रोजी 565.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते आणि ते आतापर्यंत ठेवले असते, तर त्याला आज 5.74 लाख रुपये मिळाले असते. 

75 देशांमध्ये पसरलेला व्यवसाय या कंपनीचे बाजार भांडवल 17640 कोटी रुपये आहे. हा पॉवर स्टॉक त्याच्या गुंतवणूकदारांसाठी सतत फायदेशीर सौदा ठरत आहे. या वर्षी 2024 मध्ये आतापर्यंत त्रिवेणी टर्बाइनच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी वाढली आहे, तर गेल्या एका वर्षात हा शेअर 38.24 टक्क्यांनी वाढला आहे. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड ही औद्योगिक स्टीम टर्बाइन उत्पादक कंपनी आहे. कंपनी मुख्यत्वे वीज निर्मिती उपकरणे निर्मिती आणि पुरवठा करते. त्यांची उत्पादने जगातील 75 देशांना पुरवले जातात. या देशांमध्ये युरोप, आफ्रिका, मध्य आणि लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशियाई देशांचा समावेश आहे.

Sakuma Exports ने दिला 700% परतावा 

मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीतील पुढील नाव पेनी स्टॉकचे आहे. सकुमा एक्सपोर्ट्सचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी पैसे छापण्याचे मशीन बनले आहे. गेल्या चार वर्षांत या शेअरची किंमत 3.33 रुपयांवरून 27.50 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे गुंतवले, त्यांना 700 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. मंगळवारी या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर 1.48 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

शेअर इंडिया सिक्युरिटीजतिसऱ्या स्टॉकने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा दिला. शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या चार वर्षांत 1400 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. 25 सप्टेंबर 2020 रोजी या शेअरचे मूल्य 103 रुपये होते, जे आता 1626 रुपयांच्या पातळीवर आले आहे. त्यानुसार या कालावधीत ज्यांनी या शेअरमध्ये पैसे गुंतवले, त्यांना 1465.97 टक्के परतावा मिळाला आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक