Lokmat Money >शेअर बाजार > राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक

राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक

Multibagger Stock: कंपनीने बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16,21,79,720 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:42 PM2023-11-26T19:42:20+5:302023-11-26T19:42:41+5:30

Multibagger Stock: कंपनीने बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16,21,79,720 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत.

Multibagger Stock: Rafale's speed of this defence stock, investment quadrupled in six months | राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक

राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक

Multibagger Stock: केंद्र सरकार 'मेक इन इंडिया' उपक्रमावर भर देत असल्यामुळे, अनेक संरक्षण शेअर्समध्ये अलीकडच्या काळात जोरदार वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील कंपनी अवंटेल लिमिटेडच्या शेअर्सचाही यात समावेश आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, म्हणजेच शुक्रवारी(24 नोव्हेंबर) हा संरक्षण शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 128.60 रुपयांवर बंद झाला. 

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली होती, ज्या अंतर्गत त्याने 24 नोव्हेंबर रोजी X बोनस ट्रेड केला आहे. गेल्या एका महिन्यात Avantel Ltd ने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर, गेल्या 6 महिन्यांत 291 टक्के वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 400 टक्के वाढला आहे. 

बोनस शेअर्सचे वाटप करण्यात आले 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, त्यांनी बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16,21,79,720 इक्विटी शेअर जारी केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांची नावे 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत रेकॉर्डमध्ये होती, त्यांना हे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या अंतर्गत कंपनी प्रत्येक 1 शेअरसाठी 2 रुपये दर्शनी मूल्याने दोन नवीन इक्विटी शेअर जारी करेल. मागील वर्षीदेखील कंपनीने 3:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले होते.

ट्रेंडलाइन डेटानुसार, कंपनीने जून 2001 पासून 20 वेळा लाभांश जारी केला आहे. स्टॉकने गेल्या 12 महिन्यांत प्रति शेअर 1 रुपये लाभांश जाहीर केला. त्याचे बोनस, स्प्लिट्स आणि डिव्हिडंड समायोजित करून, सध्याच्या बाजारभावावर स्टॉकचे लाभांश उत्पन्न 0.05% आहे.

सहा महिन्यांत पैसा चौपट झाला
सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 32.89 रुपये होती. आता हा 128.60 रुपये झाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी Avantel Limited च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 391,000 रुपये झाले असेल. अशा प्रकारे अवघ्या 6 महिन्यांत हा पैसा जवळपास चार पटीने वाढला आहे.

(टीप- कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger Stock: Rafale's speed of this defence stock, investment quadrupled in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.