Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: ३ वर्षांमध्ये १९३९५४%चं छप्परफाड रिटर्न; 'या' शेअरनं ₹२०००० चे केले ₹४ कोटी 

Multibagger Stock: ३ वर्षांमध्ये १९३९५४%चं छप्परफाड रिटर्न; 'या' शेअरनं ₹२०००० चे केले ₹४ कोटी 

Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर दुसरीकडे असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:13 PM2024-08-20T13:13:47+5:302024-08-20T13:14:05+5:30

Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर दुसरीकडे असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलं.

Multibagger Stock Roofing Return of 193954 percent in 3 Years Diamond Power Infrastructure Limited share made rs 20000 to rs 4 crore  | Multibagger Stock: ३ वर्षांमध्ये १९३९५४%चं छप्परफाड रिटर्न; 'या' शेअरनं ₹२०००० चे केले ₹४ कोटी 

Multibagger Stock: ३ वर्षांमध्ये १९३९५४%चं छप्परफाड रिटर्न; 'या' शेअरनं ₹२०००० चे केले ₹४ कोटी 

Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर दुसरीकडे असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलं. जर कोणी खूप कमी वेळात कोट्यधीश झाला तर? यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, परंतु एका शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना काही वर्षांमध्ये कोट्यधीश केलं आहे. हा शेअर केवळ ३ वर्षांत ७३ पैशांवरून १४१६.६० रुपयांवर पोहोचला आहे, त्यावर विश्वास दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

हा शेअर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा  (Diamond Power Infrastructure Limited) आहे. ही कंपनी इंटिग्रेटेड पॉवर इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर आहे. ही कंपनी विद्युत केबल, कंडक्टर आणि टॉवर तयार करते. कंपनीचं मार्केट कॅप ७४०० कोटी रुपये आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, या शेअरनं २०२४ मध्ये आतापर्यंत ८०१ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. ६ महिन्यांत हा शेअर ३८० टक्क्यांनी वधारला आहे.

३ वर्षांमध्ये १९३९५४ टक्क्यांचा रिटर्न

गेल्या ३ वर्षात डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरची किंमत १९३९५४ टक्क्यांनी वाढली आहे. १६ ऑगस्ट २०२१ रोजी बीएसईवर शेअरचा भाव ७३ पैसे प्रति शेअर होता. पण १६ ऑगस्ट २०२४ रोजी हा भाव १४१६.६० रुपयांवर बंद झाला. जर कोणी तीन वर्षांपूर्वी ७३ पैशांच्या शेअरमध्ये फक्त १०,००० रुपये गुंतवले असते आणि अद्याप शेअर्स विकले नसते तर त्याची गुंतवणूक १.९४ कोटी रुपये झाली असती. तर, जर कोणी शेअरमध्ये २०००० रुपये गुंतवले असतील तर ती रक्कम 3.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

अदानी एनर्जी सोल्युशन्सकडून मिळालेली ऑर्डर

यावर्षी जुलै मध्ये डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडकडून सुमारे ८९९.७५ कोटी रुपयांच्या कंडक्टर पुरवठ्याची ऑर्डर मिळाली होती. हे न्यू जनरेशनच्या अॅल्युमिनियम मिश्र धातू वाहकांच्या पुरवठ्यासाठी होते. एप्रिल २०२५ पर्यंत हा आदेश पूर्ण करायचा आहे. कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

जून तिमाहीत नफा २०० टक्क्यांनी वाढला

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा निव्वळ एकत्रित नफा एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत २०० टक्क्यांनी वाढून १६.५६ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी तो ५.५२ कोटी रुपये होता. एबिटडा गेल्या वर्षीच्या ११.४७ कोटी रुपयांवरून सुमारे १११ टक्क्यांनी वाढून २४.१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निव्वळ विक्री जून २०२३ तिमाहीतील ७४.४५ कोटी रुपयांवरून २००.६९ टक्क्यांनी वाढून २२३.८६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Multibagger Stock Roofing Return of 193954 percent in 3 Years Diamond Power Infrastructure Limited share made rs 20000 to rs 4 crore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.