Join us

Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 12:18 PM

Multibagger Share: इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरनं अवघ्या वर्षभरात ५०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर १० लाख रुपयांत केलं आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी.

Multibagger Share: इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरनं अवघ्या वर्षभरात ५०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर १० लाख रुपयांत केलं आहे. या शेअरनं उत्कृष्ट परतावा दिला असून शेअरची किंमत २९.९२ रुपयांवरून ६१२.८५ रुपयांवर आलीये. ही कंपनी एसएमई सेगमेंटमधील असून याचं नाव बोंडाडा इंजिनीअरिंग (Bondada Engineering) आहे.

बोंडाडा इंजिनीअरिंगचा आयपीओ ऑगस्ट २०२३ मध्ये आला होता आणि तो ११२ पटींपेक्षा अधिक सब्सक्राइब झाला होता. बीएसई एसएमईवर ३० ऑगस्ट २०२३ रोजी हा शेअर ९० टक्के प्रीमियमसह १४२.५० रुपयांवर लिस्ट झाला. कंपनी दूरसंचार आणि सौर ऊर्जा उद्योगातील ऑपरेशनल कंपन्यांना ईपीसी सेवा आणि ओ अँड एम सेवा प्रदान करते.

वर्षभरात एक लाखाचे झाले २० लाख

बीएसईच्या आकडेवारीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी बीएसईवर हा शेअर ६१२.८५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ३० ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर या कालावधीत या शेअरनं सुमारे १९४३ टक्के परतावा दिला आहे.

परताव्याच्या आधारे हिशोब केल्यास जर एखाद्यानं ऑगस्ट २०२३ अखेर शेअरमध्ये १०००० रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअरची विक्री केली नसेल तर त्याची गुंतवणूक २ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. त्याचप्रमाणे २० हजार रुपयांची गुंतवणूक ४ लाखांपेक्षा जास्त, ५० हजार रुपयांची गुंतवणूक १० लाख रुपयांपेक्षा अधिक आणि एक लाख रुपयांची गुंतवणूक २० लाख रुपयांपेक्षा अधिक झाली असती.

६ महिन्यांत हा शेअर १६८.२३ टक्क्यांनी वधारला

२०२४ मध्ये आतापर्यंत बोंडाडा इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये ६३४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ६ महिन्यांत १६८.२३ टक्के आणि एका आठवड्यात किंमत ११ टक्क्यांनी वाढली आहे. २ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवर्तकांकडे कंपनीत ६३.३३ टक्के हिस्सा होता. कंपनीचं मार्केट कॅप ६,६०० कोटी रुपये आहे. बोंडाडा इंजिनीअरिंगचे प्रवर्तक राघवेंद्र राव बोंदडा, नीलिमा बोंदडा आणि सत्यनारायण भरतम आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग