Join us  

दीड वर्षात 1 लाखाचे झाले 10 लाख रुपये, या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 8:17 PM

Multibagger Stock: या डिफेन्स स्टॉकने दीड वर्षात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

Multibagger Stock: संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांना विविध मिशनसाठी संरक्षण उपाय पुरवणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना बंपर कमाई करुन दिली आहे. या संरक्षण स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 250 टक्के, एका वर्षात 357 टक्के आणि दीड वर्षात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

कंपनीने आता 98.85 लाख कन्व्हर्टिबल वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. 98.85 लाख कन्व्हर्टिबल वॉरंट 186 रुपये प्रति वॉरंट दराने जारी केले जात आहेत, जे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. कंपनी वॉरंट एक्सरसाइज किंमतीनुसार सुरुवातीला 4.12 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अपोलो मायक्रो सिस्टीमचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुसऱ्या तिमाहीत दमदार निकाल चालू आर्थिक वर्षाच्या (Q2FY24) दुसऱ्या तिमाहीतील अपोलो मायक्रो सिस्टीमचे निकाल दमदार राहिले आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीची विक्री 67 टक्क्यांनी वाढून रु. 87.16 कोटी झाली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 56.27 कोटी होती. कंपनीचा ऑपरेटिंग नफा 85.45 टक्क्यांनी वाढून 18.36 कोटी रुपये झाला आहे. तर, कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 300 टक्क्यांनी वाढून 6.56 कोटी रुपये झाला आहे.

शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीमचे शेअर्स 122.05 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. 3410 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 161.70 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी 23.25 रुपये आहे. हा शेअर गेल्या दीड वर्षांपासून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी म्हणजेच 17 जून 2022 रोजी हा 11.70 रुपये होते, जो आता 122 रुपये झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दीड वर्षांपूर्वी या शेअरमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना आतापर्यंत 870 टक्के मजबूत परतावा मिळाला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 299 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

1 लाखाचे 10 लाख झालेजर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये सुमारे दीड वर्षांपूर्वी म्हणजे 17 जून 2022 रोजी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असेल. अपोलो मायक्रो सिस्टीमच्या शेअरची किंमत 11.70 रुपयांवरून 122 रुपयांपर्यंत वाढल्याने हे घडले आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक