Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: 1 रुपयाच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 10 हजार रुपयांचे झाले 56 लाख

Multibagger Stock: 1 रुपयाच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 10 हजार रुपयांचे झाले 56 लाख

Hindustan Foods Share Price: शेअर मार्केटमध्ये आपला निशाणा बरोबर लागला, तर श्रीमंत व्यायला वेळ लागत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:47 PM2023-04-07T16:47:02+5:302023-04-07T16:47:08+5:30

Hindustan Foods Share Price: शेअर मार्केटमध्ये आपला निशाणा बरोबर लागला, तर श्रीमंत व्यायला वेळ लागत नाही.

Multibagger Stock: Rs 1 share gave bumper returns, Rs 10 thousand to Rs 56 lakh | Multibagger Stock: 1 रुपयाच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 10 हजार रुपयांचे झाले 56 लाख

Multibagger Stock: 1 रुपयाच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 10 हजार रुपयांचे झाले 56 लाख


Share Market Tips: शेअर मार्केटने अनेकांना मालामाल केलें आहे. पण, जितका फायदा आहेत, तितकाच धोकाही आहे. म्हणूनच शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी चांगला अभ्यास करण्याची खूप गरज असते. एकदा का तुम्हाला पॅटर्न समजला तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. पण थोडीशीही चूक झाली तर कंगाल व्हायला वेळ लागत नाही. दरम्यान, हिंदुस्तान फूड्स (Hindustan Foods) नावाच्या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या शेअरने गेल्या 11 वर्षांत आश्चर्यकारक परतावा दिला आहे.

11 वर्षात 56000 टक्के परतावा
कंपनीच्या स्टॉकने गेल्या 11 वर्षांत गुंतवणूकदारांना 56000 टक्के परतावा दिला आहे. हा शेअर 1 रुपयांवरुन 560 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 749.15 रुपये तर, निच्चांक पातळी 328.73 रुपये आहे. गुरुवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात शेअर दीड टक्क्यांहून अधिक वाढून 565.35 रुपयांवर पोहोचला.

असा सुरू झाला प्रवास
हिंदुस्तान फूड्सचा शेअर 24 ऑगस्ट 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर रु.1 वर सूचीबद्ध झाला. आता हा शेअर गुरुवारी म्हणजेच 6 एप्रिल 2023 रोजी 565.35 रुपयांवर पोहोचला आहे. एखाद्या व्यक्तीने 24 ऑगस्ट 2012 रोजी या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत विकले नसतील, तर या शेअर्सने त्या व्यक्तीला 56.53 लाख रुपयांचा परतावा मिळवून दिला आहे.

सहा वर्षांत 1627% परतावा
हिंदुस्थान फूड्सच्या स्टॉकने गेल्या 10 वर्षांत 35000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच, गेल्या सहा वर्षांत 1627% परतावा दिला आहे. जर आपण स्टॉकचा सहा वर्षांचा परतावा पाहिला तर 7 एप्रिल 2017 रोजी 32.42 रुपये होता. 6 एप्रिल 2023 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात हा 565.35 रुपयांवर पोहोचला. यानुसार, सहा वर्षांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 17.43 लाख रुपये झाली असती.

कंपनीची माहिती
हिंदुस्तान फूड्स फूड अँड बेव्हरेज, होम केअर फॅब्रिक, केअर ब्युटी आणि पर्सनल केअर, हेल्थ केअर आणि वेलनेस लेदर आणि स्पोर्ट्स, फूटवेअर आणि पेस्ट कंट्रोल या श्रेणींमध्ये काम करते. यामध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी 64.85% आणि सार्वजनिक भागीदारी 35.15% आहे.

Web Title: Multibagger Stock: Rs 1 share gave bumper returns, Rs 10 thousand to Rs 56 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.