Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जाणकार लोक दोन महत्त्वाचे सल्ले देतात. पहिला सल्ला म्हणजे अल्पावधीत मोठा नफा मिळविण्याच्या मोहात न पडता दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. दुसरा सल्ला हा आहे की स्वतः कंपनीच्या मूलभूत गोष्टी तपासा आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हाच गुंतवणूक करा. बुलेट आणि रॉयल एन्फिल्ड तयार करणारी आयशर मोटर्सच्या (Eicher Motors Stock) शेअर्सकडे पाहा. या स्टॉकनं गेल्या काही महिन्यांदरम्यान लाँग टर्म इन्व्हेस्टर्सला जबरदस्त मालामाल केलं आहे.
१६ ऑक्टोबर १९९८ रोजी बीएसईवर आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत केवळ १ रूपया होती. आता याची किंमत ३ हजारांवर गेली आहे. शुक्रवारी कामाकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात हा शेअर ३१७५.४० रूपयांवर ट्रेड करत होता. या कालावधीदरम्यान या शेअरनं ३,१५,०० टक्क्यांची झेप घेतली आहे. जर या शेअरमध्ये कोणी सुरूवातीला १ रूपयाप्रमाणे १ लाख रूपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या या १ लाखांचं मूल्य आज ३१ कोटी रूपयांपेक्षाही अधिक असतं.
१० वर्षांत १४ पट वाढ
१० वर्षांपूर्वीची तुलना केल्यास आयशर मोटर्सचा शेअर मल्टिबॅगर रिटर्न देणारा ठरला आहे. २२ जून २०१२ रोजी बीएसईवर या शेअरची किंमत २०० रूपये होती. आताच्या तुलनेत यात १४८७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी २०० रूपयांच्या लेव्हलवर असताना कोणी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर याचं मूल्य आज १५.८७ लाख रूपये असतं. गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असतानाच आता पुन्हा या शेअरची दमदार कामगिरी सुरू झाली आहे. आता हा शेअर हॉल टाईम हायच्या जवळ पोहोचला आहे.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घ्यावा.)