Join us

Multibagger stock: 270 रुपयांचा शेअर 50 हजार रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल; कंपनी नेमकं काय करते..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 8:56 PM

Multibagger stock 2022: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोट्याधीश व्हायचे असेल, तर धीर धरणे खूप गरजेचे आहे.

Most Costlier multibagger share:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोट्याधीश व्हायचे असेल, तर धीर धरणे खूप गरजेचे आहे. मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पेज इंडस्ट्रीजचे शेअर्सही असे शेअर्स आहेत, ज्याने आज(शुक्रवारी) दिवसभरात पहिल्यांदाच 50,000 रुपयांचा आकडा गाठला.

शेअर्सच्या त्रैमासिक निकालानंतर, अ‍ॅपेरल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या या स्टॉकने सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 50,000 रुपयांचा टप्पा गाठला आहे. सध्या हा स्टॉक सर्वकालीन उच्चांकावर आहे. हा शेअर शीर्षस्थानी गेल्यानंतर थोडीशी विक्री झाली आणि इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 0.100% च्या वाढीसह 49,059.90 रुपयांवर व्यवहार करत आहे. पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरुवारी जून 2022ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 207 कोटींचा निव्वळ नफा कमावला असून, त्यांचा रेव्हेन्यू 1,341 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

ब्रोकरेज हाऊसने तिमाही निकालानंतर 52,000 रुपयांचे लक्ष्य ठेवून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच्या मते, कंपनी गुंतवणुकीच्या नवीन मार्गावर आहे आणि त्यामुळेच आगामी काळात या शेअरमध्ये मोठी वाढ दिसू शकते. या स्टॉकला होल्ड रेटिंग देत, अॅक्सिस सिक्युरिटीजने ₹ 51,900 चे लक्ष्य ठेवले आहे.

कंपनी काय करते?पेज इंडस्ट्रीज इनरवेअरचे उत्पादन आणि किरकोळ विक्रीचा व्यवसाय करते. कंपनीकडे सध्या मजबूत बाजारपेठ आहे. भारताव्यतिरिक्त, कंपनीकडे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये जॉकी इंटरनॅशनलसाठी विशेष परवाने आहेत. त्यांच्याकडे भारतीय बाजारपेठेसाठी स्पीडो इंटरनॅशनलसह व्यवसाय परवाना आहे. हा स्टॉक मार्च 2007 मध्ये फक्त 270 रुपयांना लिस्ट झाला होता. म्हणजेच 15 वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 18110% पेक्षा जास्त वाढला आहे.

(डिस्केमर: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. आम्ही कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही आहोत. गुंतवणुक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायगुंतवणूक