Multibagger Stock : शेअर मार्केटमधील गुंतवणूक धोक्याचे मानली जाते. पण, बऱ्याचदा असा एखादा शेअर मिळतो, जो गुंतवणूकदारांना बंपर कमाई करुन देतो. अशी बरीच उदाहरणे आहेत, ज्यात शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकीत दमदार कामगिरी केली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिफेन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरशी संबंधित नाईब लिमिटेड(NIBE ltd)चा शेअर या यादीत येतो. या शेअरने फक्त पाच वर्षांत एक लाख रुपयांचे 1 कोटी रुपये केले आहेत.
5 रुपयांचा शेअर 758वर पोहोचला
नाईब लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पाच वर्षात करोडपती झाले आहेत. आपण या स्टॉकच्या कामगिरीकडे पाहिली, तर त्याने 2019 पासून 2024 च्या सुरूवातीपर्यंत, म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत 12648 टक्के परतावा दिला आहे. 5 जुलै 2019 रोजी कंपनीचा शेअर 5.95 रुपयांवर होता, तो सोमवार 8 जानेवारी 2024 रोजी 758.50 रुपयावर बंद झाला.
1 लाखाचे एक कोटीझाले
ज्यांनी पाच वर्षांपूर्वी नाईब लिमिटेडच्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल, त्यांना आता 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळेल. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना 9600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात काम करणार्या या कंपनीचे मार्केट कॅप 948.67 कोटी रुपये आहे. सोमवारी ट्रेडिंग दरम्यान स्टॉकने सर्वकालीन उच्चांक गाठला.
सहा महिन्यांत 100% पेक्षा जास्त परतावा
या मल्टीबॅगर स्टॉकने पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 12000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या एका वर्षात याने 65 टक्के वाढ नोंदविली आहे. विशेष म्हणजे, सहा महिन्यांत हा शेअर 118 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
(नोट-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)