शेअर बाजारात घसरण असो किंवा तेजी असो, अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअर्सनं सातत्याने बंपर परतावा दिला आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना क्षणार्धात लखपती पासून कोट्यधीश बनवले आहे. या समभागांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठीही संयम असणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल. असाच एक स्टॉक स्मॉलकॅप कंपनी डब्ल्यूपीआयएल लिमिटेडचा आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना सातत्याने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना आशा आहे की आगामी काळात शेअरची किंमत आणखी वाढू शकेल.
ज्यांनी स्टॉक स्मॉलकॅप कंपनी डब्ल्यूपीआयएल लिमिटेडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते. ते आज कोट्यधीश झाले आहेत. 28 फेब्रुवारी 2003 रोजी मुंबई शेअर बाजारावर WPIL लिमिटेडचे शेअर्स 2.80 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1,690.55 रुपयांवर बंद झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 60 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2003 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आता 6 कोटींहून अधिक परतावा मिळाला असता. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, WPIL लिमिटेडचा करानंतरचा नफा 80 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. हा नफा 450 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या मजबूत महसुलामुळे कंपनीच्या नफ्यात ही झेप दिसून आली आहे.
अस्थिरतेची स्थिती
शेअर बाजारात अद्यापही अस्थिरतेची स्थिती आहे. कधी बाजारात तेजी तर कधी घसरण पाहायला मिळते. मात्र, बाजारात घसरण झाल्यानंतरही असे अनेक शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या शेअर्समध्ये अजूनही तेजी पाहायला मिळत आहे.