Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: या शेअरच्या किंमतीत वर्षभरात १५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर २ वर्षांत या शेअरमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिकचा रिटर्न दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:33 PM2024-05-20T13:33:54+5:302024-05-20T13:34:12+5:30

Multibagger Stock: या शेअरच्या किंमतीत वर्षभरात १५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर २ वर्षांत या शेअरमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिकचा रिटर्न दिलाय.

Multibagger stock shriram pistons and rings Stock more than 500 percent return in 2 years share market | Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: गेल्या काही काळात अनेक शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. यापैकीच एक शेअर म्हणजे श्रीराम पिस्टन अँड रिंग्स. या शेअरच्या किंमतीत वर्षभरात १५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर २ वर्षांत या शेअरमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिकचा रिटर्न दिलाय. कोरोनाच्या महासाथीनंतर देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रानं जोरदार पुनरागमन केलं. याचाच फायदा या शेअरला झालाय. चौथ्या तिमाहीत भारताच्या प्रवासी वाहनांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री दिसून आली.
 

ग्रामीण बाजारपेठेतील सुधारणांमुळे दुचाकींच्या विक्रीत वाढ झाली आणि २०० सीसी सेगमेंटमध्ये दुचाकींना जोरदार मागणी निर्माण झाली. या सर्वांमुळे ऑटो कंपोनेंट्सला जोरदार मागणी निर्माण झाली. याव्यतिरिक्त, आफ्टरमार्केट विक्री आणि निर्यातीत वाढ झाल्यानं ऑटो पार्ट्सचं प्रमाण आणखी वाढलं आहे.
 

श्रीराम पिस्टन अँड रिंग्सचा शेअर गेल्या वर्षभरात ८०२.९५ रुपयांवरून २०६७ रुपयांच्या सध्याच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत यात १५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत या शेअरमध्ये ५१२ टक्के वाढ झाली असून गेल्या चार वर्षांत या शेअर्सनं ६५४ टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिलाय.

 

चौथ्या तिमाहीत नफा वाढला
 

गेल्या आठवड्यात कंपनीनं चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या कालावधीत कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर १२.६ टक्क्यांनी वाढून ८०२ कोटी रुपये झाला आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्षात महसूल १४.५ टक्क्यांनी वाढून ३३५१ कोटी रुपये झाला आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Multibagger stock shriram pistons and rings Stock more than 500 percent return in 2 years share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.