Multibagger Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. त्यामुळेच गुंतवणूकीपूर्वी त्याची माहिती आणि अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. शेअर बाजारात घसरत होत असली तरी या शेअरनं गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. असा एक शेअर ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचा आहे.
एक असा काळ होता जेव्हा हा शेअर ३०० रुपयांवर व्यवहार करत होता. परंतु आता हा शेअर आपटून १५ रुपयांपर्यंत खाली आला. आता हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. या शेअरमध्ये आता १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा आहे. २३ जून रोजी शेअर ३ टक्क्यांनी वाढून १३.९० रुपयांवर पोहोचला होता. गेल्या ५२ आठवड्यांबद्दल बोलायचं झालं तर या शेअरची किंमत ५.९ रुपयांवरून १३.९ रुपयांपर्यंत वाढली आहे.
गुंतवणूकदार मालामाल
सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. जानेवारी २००८ मध्ये कंपनीचे शेअर्स ३७५ रुपयांवर होते. यानंतर या शेअरच्या किंमतीत सातत्यानं घसरण झाली. गेल्या १४ वर्षांत हा शेअर तब्बल ९६ टक्क्यांपर्यंत घसरलाय. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५ रुपये होता. १३ जून २०२३ रोजी शेअर १५.७६ रुपयांवार पोहोचला. हा कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. कंपनीचं मार्केट कॅप १७,१९४.९० कोटी रुपये आहे.
३० रुपयांपर्यंज जाऊ शकतो
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सुजलॉन एनर्जीचा शेअर २ ते ८ महिन्यांच्या कालावधीत १८ वरून ३० रुपयांवर जाऊ शकतो. गुंतवणूकदार या शेअरसाठी ७.३० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवू शकतात. दरम्यान, गुंतवणूकदारदेखील या शेअरला पसंती देत आहेत. कंपनीचे फंडामेंटल्सही पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगले झालेत. मजबूत ऑर्डरबुक हे यामागील महत्त्वाचं कारण आहे. कंपनीला गेल्या महिन्यापासून नवीन ऑर्डर्स मिळत आहेत. दरम्यान, कंपनीची बॅलन्सशीटही मजबूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)