Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock Investment: भन्नाट! ९० ₹चा शेअर गेला ३८० ₹वर; १ वर्षांत कंपनीने दिले ३०० टक्के रिटर्न, तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock Investment: भन्नाट! ९० ₹चा शेअर गेला ३८० ₹वर; १ वर्षांत कंपनीने दिले ३०० टक्के रिटर्न, तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock Investment: या कंपनीच्या शेअरने अलीकडेच उच्चांकी पातळी गाठली असून, अल्पावधीत मोठ्या उंचीवर जाणारा हा मल्टिबॅगर स्टॉक ठरल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:19 PM2022-12-05T17:19:44+5:302022-12-05T17:20:35+5:30

Multibagger Stock Investment: या कंपनीच्या शेअरने अलीकडेच उच्चांकी पातळी गाठली असून, अल्पावधीत मोठ्या उंचीवर जाणारा हा मल्टिबॅगर स्टॉक ठरल्याचे सांगितले जात आहे.

multibagger stocks bls company multibagger stock reached from rs 90 to rs 380 gave 300 percent return in just one year | Multibagger Stock Investment: भन्नाट! ९० ₹चा शेअर गेला ३८० ₹वर; १ वर्षांत कंपनीने दिले ३०० टक्के रिटर्न, तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock Investment: भन्नाट! ९० ₹चा शेअर गेला ३८० ₹वर; १ वर्षांत कंपनीने दिले ३०० टक्के रिटर्न, तुम्ही घेतलाय का?

Multibagger Stock Investment: मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात घसरलेल्या शेअर मार्केटचा निर्देशांक आता विक्रमी टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकविध कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. परिणामतः गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळत आहे. यामुळे कंपन्यांवरील विश्वासही वाढत असल्याचे म्हटले जात आहे. यातच एका कंपनीने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत स्थान पटकावले असून, केवळ वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल ३०० टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस ही व्हिसा सेवा पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. हा स्मॉल-कॅपमधील स्टॉक असून, एका वर्षात ३०५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारा मल्टिबॅगर स्टॉक ठरला आहे. सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत ९० रुपये होती, तोच शेअर आता ३८० रुपयांपर्यंत गेला आहे. बीएलएस इंटरनॅशनलचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापर्यंत पोहोचण्यापासून काही पावले दूर आहेत.

सन २०२२ वर्ष कंपनीसाठी अत्यंत फलदायी

गेल्या वर्षी ६ डिसेंबर २०२१ रोजी हा शेअरची किंमत सुमारे ९३.५० रुपये होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा शेअर ९१ ते ११० रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत होता. तर सन २०२२ हे वर्ष या स्टॉकसाठी फलदायी ठरले. गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले. एका वर्षात BLS कंपनीचे शेअर्स किमान ३०५.५० टक्क्यांनी वाढले आहेत. BSE वर कंपनीचे मूल्यांकन सुमारे ७,६२५ कोटी रुपये आहे.

दरम्यान, BLS स्टॉक एका वर्षात ३१४ टक्क्यांपेक्षा अधिक वर गेला होता. ०१ डिसेंबर २०२२ रोजी नवीन उच्चांक नोंदवला. व्हिसा, पासपोर्ट, कॉन्सुलर, ई-गव्हर्नन्स, व्हेरिफिकेशन, बायोमेट्रिक, ई-व्हिसा आणि किरकोळ सेवा या क्षेत्रांमध्ये बेंचमार्क सेट करणारी BLS इंटरनॅशनल ही प्रतिष्ठीत कंपनी जगभरातील दूतावास आणि सरकारांसाठी एक पसंतीचे भागीदार आहे.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: multibagger stocks bls company multibagger stock reached from rs 90 to rs 380 gave 300 percent return in just one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.