Join us

अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने बदलले गुंतवणूकदारांचे नशीब, एका झटक्यात झाले कोट्यधीश...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 5:50 PM

या शेअरने गुंतवणूकदारांना 38,000 पट परतावा दिला.

multibagger stocks: शेअर मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. यामध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या (Hazoor Multi Projects Ltd) शेअर्सचाही समावेश आहे. या शेअरने गेल्या काही वर्षात 38,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 1 रुपयाच्या(29 मार्च 2019 रोजी) शेअरने 380 रुपयांची पातळी ओलांडली, ज्यामुळे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले. 

गेल्या 5 वर्षात या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 38100 पट परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपये असताना 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांचे पैसे आता 3.81 कोटी रुपये झाले असतील.

काय आहे शेअर्सचा इतिहास ?गेल्या आठवडाभरात दोन वेळा कंपनीचे शेअर्स अपर सर्किटला आले. गुरुवारी आणि शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सला मोठी मागणी होती. त्यामुळे या दोन दिवसांत शेअर्समध्ये अपर सर्किट लागले. मात्र, वाढ होऊनही गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 2 टक्के वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, 6 महिन्यांपूर्वी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडची किंमत 130 रुपये होती. या कालावधीत भागधारकांना 190 टक्के नफा झाला. जर आपण गेल्या एका वर्षाबद्दल बोललो तर, पोझीशनल गुंतवणूकदारांना 280 टक्के फायदा झाला आहे.

(टीप- आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक