Stock Market Update: शेअर मार्केटची गुंतवणूक मोठ्या जोखमीची असते. यातून कधी मोठा फायदा होतो, तर कधी नुकसानही होते. प्रत्येकजण पैसे कमावण्याच्या उद्देशानेच शेअर मार्केटमध्ये येतो. कधी नशीबाची साथ मिळून तुमच्या हाती चांगला परतावा देणारे शेअर्स लागू शकतात. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत मोठा परतावा दिला आहे. अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, त्या कंपनीचे नाव Aurionpro Solutions आहे. कोरोना काळापासून या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणुकदारांना बंपर परतावा दिला आहे. कोरोना काळात हा स्टॉक 33 रुपयांवर आला होता, तर आज या स्टॉकने 1000 रुपयांपेक्षा जास्तीचा उच्चांक गाठला आहे.
13 मार्च 2020 रोजी Aurionpro Solutions Ltd कंपनीच्या स्टॉकची बंद किंमत NSE वर रु.32.70 होती. यानंतर शेअरच्या किमतीत हळूहळू वाढ दिसून आली. सप्टेंबर 2022 मध्ये स्टॉकने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला. दोन वर्षांत शेअरच्या किंमत अनेक पटींनी वाढली. यानंतर स्टॉकमध्ये थोडीशी घसरण नक्कीच दिसून आली, परंतु एप्रिल 2023 नंतर स्टॉकने पुन्हा एकदा वेग पकडला.
आता शेअरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे गेला आहे. शेअरची किंमत तीन वर्षांत 33 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 21 जुलै रोजी NSE वर Aurionpro Solutions च्या शेअरची किंमत 982 रुपयांवर बंद झाली. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1034 रुपये राहिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे 10,000 शेअर्स 33 रुपयांना विकत घेतले असतील, तर त्या व्यक्तीला आज 1 कोटी रुपये मिळतील.