Multibagger Stock: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारानं मल्टिबॅगर परतावा दिला आहे. त्यापैकीत एक शेअर म्हणजे सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड. ही अशी कंपनी आहे ज्यानं गेल्या एका वर्षात शेअर बाजारात जोरदार परतावा दिलाय. आता कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंपनी शेअर्सच्या स्प्लिटमुळे चर्चेत आहे. या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये.
कधी आहे रकॉर्ड डेट?
कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 1 शेअर 10 भागांमध्ये विभागला जाईल. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू कमी होऊन 1 रुपया प्रति शेअर होईल. कंपनीनं गुरुवार, 18 एप्रिल 2024 ही स्टॉक स्प्लिटची तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच या दिवशी शेअर्सचं वाटप केलं जाणार आहे.
2021 मध्ये कंपनीनं दिलेला डिविडंड
कंपनी प्रथमच शेअर्स स्प्लिट करत आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीनं 2021 मध्ये डिविडेड दिला होता. त्यानंतर कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 0.40 रुपये डिविडेंड वितरित केला.
कंपनीची उत्तम कामगिरी
बीएसईमध्ये गुरुवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.73 टक्क्यांच्या उसळीनंतर 870.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या कालावधीत पोझिशनल गुंतवणूकदारांनी 129 टक्के नफा कमावला आहे. Trendlyen डेटानुसार, कंपनीनं 1 वर्षात शेअर बाजारांमध्ये 371 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 12.1 टक्क्यांनी वाढली आहे.
कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 905.80 रुपये आणि नीचांकी स्तर 168.05 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप 1510.37 कोटी रुपये आहे.
(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)