शेअर बाजारात काही असे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. हे शेअर्स सातत्यानं फोकसमध्ये असतात. ९९ टक्क्यांनी घसरल्यानंतर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी गेल्या ४ वर्षांत छप्परफाड रिटर्न दिले आहेत. सुझलॉन एनर्जीचा शेअर ९९ टक्क्यांहून अधिक घसरून २ रुपयांवर आला होता. कंपनीचा शेअर शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी ५४.६८ रुपयांवर बंद झाला. सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनं या काळात गुंतवणूकदारांना २६०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५६.४५ रुपये आहे. तर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १७.३३ रुपये आहे.
सुझलॉन एनर्जीचा शेअर ४ जानेवारी २००८ रोजी ३७३ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ३ एप्रिल २०२० रोजी या पातळीवरून ९९ टक्क्यांहून अधिक घसरून २.०२ रुपयांवर आला. गेल्या चार वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. १२ जुलै २०२४ रोजी ५४.६८ रुपयांवर बंद झाला. सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनं या काळात २६०७ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ३ एप्रिल २०२० रोजी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या २७.०६ लाख रुपये झाली असती.
वर्षभरात २०३ टक्क्यांहून अधिक वाढ
१२ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर १८ रुपयांवर होता. १२ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५४.६८ रुपयांवर बंद झाला. या वर्षी आतापर्यंत सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ४२ टक्क्यांनी वधारले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारीला सुझलॉन एनर्जीचा शेअर ३८.४८ रुपयांवर होता. १२ जुलै रोजी कंपनीचा शेअर ५४.६८ रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे समभाग ३५ टक्क्यांनी वधारलं आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)