Join us

Multibagger: मद्य बनवणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 1.30 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 6:11 PM

Multibagger stock: मॅजिक मोमेंट व्होडका आणि 8PM व्हिस्कीचे निर्माते Radico खेतान लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत.

Multibagger stock: मॅजिक मोमेंट व्होडका आणि 8PM व्हिस्कीचे निर्माते Radico खेतान लिमिटेडच्या शेअर्सनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. इअर टू डेट(YTD) आधारावर, हा स्टॉक 17.81 टक्क्यांनी घसरला आहे. पण रॅडिको खेतानचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत 35 टक्क्यांहून अधिक वाढलेही आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे भांडवल 128 पटीने वाढले आहे.

7 रुपयांवरुन 1000च्या पुढे20 जून 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 रुपये होते. गेल्या आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंग दिवशी रॅडिको खेतानच्या शेअर्सने हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी त्यांचे शेअर्स 0.51 टक्क्यांनी घसरून 1,003 रुपयांवर बंद झाले. मात्र, एका महिन्यात त्यांचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

एक लाखाचे झाले कोटींपून अधिकएखाद्या गुंतवणूकदाराने रॅडिको खेतानमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या शेअर्सची किंमत आज 1.30 कोटी रुपये झाली असती. म्हणजेच, दीर्घकालीन गुंतवणुकीत कंपनीने गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला. अल्पावधीतही कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात कंपनीचे शेअर्स सहा टक्क्यांनी वाढले.

शेअर्सचे भाव वर-खाली होत आहेतरॅडिको खेतान ही देशातील सर्वात जुन्या दारू कंपन्यांपैकी एक आहे. या वर्षी 6 जानेवारी रोजी त्याचा शेअर 1299.55 रुपयांवर पोहोचला, जी एका वर्षातील त्याची सर्वोच्च पातळी होती. मात्र, त्यानंतर तो 44 टक्क्यांनी घसरून 731.35 रुपयांवर आला. घसरणीनंतर कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा जोर पकडला आणि सध्या शेअर 1000 रुपयांच्या वर आहे.

कंपनीचे अनेक ब्रँड आहेतभारतातील इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) च्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक म्हणून, रॅडिको खेतान लिमिटेड हे मद्य उद्योगातील एक प्रमुख नाव आहे. कंपनीकडे कॉन्टेसा एक्सएक्सएक्स रम, ओल्ड अॅडमिरल ब्रँडी, मॅजिक मोमेंट वोदका आणि 8 पीएम व्हिस्की यासह 15 ब्रँडचा संग्रह आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय