जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल, तर तुम्ही ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. मुंबई क्राईम ब्रान्चनं कांदिवली पूर्वेला राहणाऱ्या ४५ वर्षीय जतिन सुरेश मेहताला अटक केली आहे. त्याच्यावर डब्बा ट्रेडिंगचा आरोप आहे आणि ४ महिन्यांमध्ये त्यानं ४६७२ कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन केलंय. आता तुम्ही विचार करत असाल की डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय? तुमचा ब्रोकर तर यात गुंतलेला नाही ना? शेअर बाजारात गुंतवलेली तुमची रक्कम सुरक्षित तर आहे ना? जाणून घेऊ सर्व माहिती.
जतिन सुरेश मेहताच्या या डब्बा ट्रेडिंगमुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या खजान्याचं १.९५ कोटी रुपयांचं नुकसान झालंय. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलंय. त्यानंतर त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
नियमाकाचा अंकूश नाही
डब्बा ट्रेडिंगला तुम्ही शेअर्सचा काळा बाझार किंवा सट्टा समजू शकता. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये एक ब्रोकर (ज्याला डब्बा ब्रोकर म्हटलं जातं) आणि एका गुंतवणूकदारामध्ये शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी कॅशचा वापर होतो. कॅश ट्रान्झॅक्शनमुळे बँकिंग आणि नियामक जसं सेबीच्या कक्षेतून हे बाहेर असते. म्हणूनच टॅक्स वाचवण्यासाठी लोक डब्बा ट्रेडिंग करतात.
नियमकाचा अंकूश नाही?
अशा प्रकारच्या डब्बा ट्रेडरकडे ना कोणतं रजिस्ट्रेशन असतं ना त्याच्याकडे सेबीचं कोणतं लायसन्स असचं. याचाच अर्थ तो गायब झाला तर मोठ्या परिश्रमानंतर त्याला क्राईम ब्रान्चच अटक करू शकते. याचं कारण म्हणजे त्याच्यावर कोणत्याही नियामकाचा अंकूश नसतो.
कसं होतं ट्रेडिंग?
डब्बा ट्रेडिंगची पद्धत सोपी असल्यानं अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. उदा. जर तुमच्याकडे एबीसी कंपनीचा शेअर १००० रुपयांचा आहे, तर गुंतवणूकदार त्याला १५०० पर्यंत पोहोचवण्याचे ब्रोकरसोबत ठरवतो. जर हा दर १५०० पर्यंत गेला तर ब्रोकर त्या गुंतवणूकदाराला त्याच्याप्रमाणे पैसे देतो. जर हा शेअर १००० च्या ऐवजी ८०० झाला तर २०० रुपयांच्य हिशोबानं ब्रोकर पैसे देतो.
डब्बा ट्रेडिंगचा हिशोब साधा सोपा असतो. यात गुंतवणूकदाराचा फायदा म्हणजे ब्रोकरचं नुकसान आणि ब्रोकरचा फायदा हे गुंतवणूकदाराचं नुकसान असतं. यात सरकारचंही नुकसान होतं, कारण यात ट्रेडिंग कॅशमध्ये होतं. यामुळे सरकारला टॅक्सद्वारे मिळणारा महसूल बुडतो. भारतात शेअर बाजाराशी निगडीत कायद्यांतर्गत डब्बा ट्रेडिंग अवैध आहे.