Join us  

Namo eWaste IPO Listing: पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट, ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला रिसायकलिंग कंपनीचा IPO; आता अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:00 AM

Namo eWaste IPO Listing: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीच्या शेअरनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला एकूण २२५ पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळाल होतं.

Namo eWaste IPO Listing: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिसायकलिंग करणाऱ्या नमो ईवेस्ट मॅनेजमेंट (Namo eWaste Management) या कंपनीच्या शेअरनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला एकूण २२५ पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळाल होतं. आयपीओ अंतर्गत ८५ रुपये दरानं शेअर्स जारी करण्यात आले होते. 

आज एनएसई एसएमईवर कंपनीचा शेअर १६१.५० रुपयांवर लिस्ट झाला, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना ९० टक्के लिस्टिंग गेन (Namo eWaste Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली आणि तो १६९.५५ रुपयांच्या (Namo eWaste Share Price) अपर सर्किटवर पोहोचला म्हणजेच आयपीओमधील गुंतवणूकदार आता ९९.४७ टक्के नफ्यात आहेत.

Namo eWaste IPO ला जबरदस्त रिस्पॉन्स

नमो ई-वेस्टचा ५१.२० कोटी रुपयांचा आयपीओ ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो एकूण २२५.६४ पट सब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) राखीव हिस्सा १५१.७५ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (एनआयआय) ३९४.२० पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा १९५.५४ पट सबस्क्राईब झाला. 

या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ६०.२४ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या रकमेचा वापर भांडवली खर्च, उपकंपनी टेकइको वेस्ट मॅनेजमेंट एलएलपीच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणक्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग