Join us  

याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 6:48 PM

आज एनएसईवर कंपनीचा शेअर 42.95 रुपयांवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 46.80 रुपये प्रति शेअर आहे. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 11.75 टक्क्यांच्या तेजीसह 45.15 रुपयांवर होता. 

नंदन डेनिम लिमिटेडचा शेअर आज तब्बल १५ टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. स्टॉक स्प्लिटशी संबंधित एक वृत्तामुळे ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे. 17 जून रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आहे. या बैठकीत शेअरच्या विभाजनासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. मंडळाची मंजुरी मिळाल्यास पहिल्याच कंपनीच्या शेअर्सचे विभाजन होणार आहे.

आज एनएसईवर कंपनीचा शेअर 42.95 रुपयांवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 46.80 रुपये प्रति शेअर आहे. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 11.75 टक्क्यांच्या तेजीसह 45.15 रुपयांवर होता. 

कंपनीने बोनस शेअरही दिले आहेत -कंपनीने 2022 मध्ये पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते. पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरसाठी 2 मोफत बोनस शेअर्स देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, यावेळी स्टॉक स्प्लिटसाठी अद्याप कोणतीही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

1 वर्षात पैसा डबल - गेल्या महिनाभरात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच 6 महिने स्टॉक होल्ड करून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 59.60 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तसेच, गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरचा भाव तब्बल 121.80 टक्क्यांनी वधारला आहे. अर्थात पोझिशनल गुंतवणूकदारांचा पैसा या कालावधीत दुप्पटहून अधिक झाला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 67.65 रुपये तर नीचांक 30.64 रुपये आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा