Join us  

Narayana Hrudayalaya Multibagger Stock : २०० ₹ वरून ७१५₹ वर पोहोचला हा शेअर, एक्सपर्ट म्हणाले ९५०₹ जाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 4:01 PM

चार वर्षांत या शेअरसनं आपल्य गुंतवणूकदारांना जवळपास २५० टक्के परतावा दिला आहे.

कोरोनाच्या महासाथीनंतर शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक शेअर नारायण हृदयालयाचा (Narayana Hrudayalaya) आहे. गेल्या ४ वर्षांत या शेअरच्या किंमतीनं रॉकेट स्पीड पकडला आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर काहीसा दबावाखाली असला तरी त्यात आणखी वाढ होण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

चार वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 250 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत हेल्थकेअर स्टॉकच्या किंमतीत ₹200 हून ₹715 पर्यंत वाढ झाली. त्याच वेळी, देशांतर्गत ब्रोकरेज प्रभुदास लिलाधरचा अंदाज आहे की दीर्घ मुदतीसाठी हा स्टॉक प्रति शेअर ₹965 पर्यंत जाऊ शकतो. यासोबतच ब्रोकरेज फर्मने या हेल्थकेअर स्टॉकला 'बाय' टॅग दिला आहे. NSE वर शेअरची किंमत सुमारे 715₹ आहे. याचा अर्थ ब्रोकरेजला या हेल्थकेअर स्टॉकमधून 35 टक्क्यांहून अधिक परतावा अपेक्षित आहे.

काय आहे कारण?नारायण हृदयालयाने आमच्या अंदाजापेक्षा जास्त EBITDA नोंदवला आहे. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. निव्वळ कर्जातही घट झाली आहे. ही वाढ पुढेही चालू राहील अशी आमची अपेक्षा आहे, असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. 

ब्रोकरेज फर्मनुसार, कंपनीने पुढील 2-3 वर्षांसाठी आपली आक्रमक कॅपेक्स योजना सुरू ठेवण्याची योजना आखली आहे. या सर्व बाबींमुळे शेअरचे टार्गेट प्राईज 965 रुपयांवरुन 920 रुपये करण्यात आली आहे.

(टीप - या लेखात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा