Lokmat Money >शेअर बाजार > १० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम

१० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम

गेल्या १० दिवसांत एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:03 PM2022-12-12T14:03:01+5:302022-12-12T14:03:23+5:30

गेल्या १० दिवसांत एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.

narmada gelatines shares climbed 100 percent in just days | १० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम

१० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम

गेल्या १० दिवसांत एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. ही कंपनी नर्मदा जिलेटिन्स आहे. नर्मदा जिलेटिनचे शेअर्स गेल्या १० दिवसांत १००% वाढले आहेत. नर्मदा जिलेटिन्सने प्रति शेअर १०० रुपये इतका मोठा विशेष लाभांश जाहीर केला आणि हे कंपनीच्या समभागांमध्ये तेजीचे एक प्रमुख कारण आहे. नर्मदा झेलेजेन्सचे शेअर्स १२ डिसेंबर २०२२ रोजी १०% च्या वरच्या सर्किटसह ४६५.८५ रुपयांवर आहेत.

२९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी नर्मदा जिलेटिनचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर २२८.५५ रुपयांवर होते. १२ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर ४६५.८५ वर ट्रेडिंग करत आहेत. नर्मदा जिलेटिनच्या समभागांनी गेल्या १० ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे २.०३ लाख रुपये झाले असते. याव्यतिरिक्त, विशेष लाभांशाच्या रेकॉर्ड तारखेपर्यंत समभाग धारण करणार्‍या गुंतवणूकदारांना १०० रुपयांचा लाभांश देखील मिळेल.

नर्मदा जिलेटिनचे शेअर्स गेल्या ५ ट्रेडिंगमध्ये जवळपास ५९% वाढले आहेत. बीएसईवर ६ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २९४ रुपयांवर होते. नर्मदा जिलेटिनचे शेअर्स १२ डिसेंबर २०२२ रोजी बीएसईवर ४६५.८५ वर आहेत. नर्मदा जिलेटिनच्या समभागांची 52 आठवडे १६० रुपये आहे. नर्मदा जिलेटिनचे मार्केट कॅप सुमारे २८२ कोटी रुपये आहे.

Crude Oil Record Fall: खुशखबर! वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आलं क्रूड ऑईल, पेट्रोलही 84 रुपये लिटर

विशेष लाभांशाची रेकॉर्ड तारीख १९ डिसेंबर २०२२ आहे.
'कंपनीच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १०००% प्रति शेअर १०० रुपये विशेष लाभांश घोषित केला आहे.

Web Title: narmada gelatines shares climbed 100 percent in just days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.