Join us  

'या' कंपनीला मिळाली ₹२००० कोटींची मोठी ॲार्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 2:09 PM

दोन दिवसांत कंपनीला मिळाली दुसरी मोठी ऑर्डर. पाहा कोणता आहे हा शेअर.

NBCC Share Price: शेअर बाजारात बुधवारी एनबीसीसीचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकी 63.65 रुपयांवर पोहोचले. कंपनीला मिळालेल्या मोठ्या ऑर्डरच्या वृत्तानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली. दरम्यान, कंपनीला केरळमधून 2,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

केरळ राज्य गृहनिर्माण मंडळाकडून 2,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. एनबीसीसीनं मरीन ड्राइव्ह, कोच्ची येथे 17.9 एकर जमिनीच्या विकासासाठी केरळ राज्य गृहनिर्माण मंडळासोबत सामंजस्य करार केलाय. एबीसीसीनं गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 साठी एकूण 8,754.44 कोटी रुपयांचा परिचालन महसूल नोंदवला. 5 सप्टेंबर अखेर कंपनीचे मार्केट कॅप 10,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून आली. गेल्या सहा महिन्यांत यामध्ये 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. 5 सप्टेंबर रोजी एनबीसीसीचा शेअर 59.1 रुपयांवर बंद झाला होता.

दोन दिवसांपूर्वीही मिळालेली ऑर्डरयापूर्वी 4 सप्टेंबर रोजी कंपनीला मुंबईतील मिंट कॉलनी, परळ येथे संक्रमण शिबिर बांधण्याची ऑर्डरही मिळाली होती. मुंबईच्या फॅक्ट्री परिसरात रिन्युअल काम आणि मिंट परिसरातील क्वार्टर्सच्या दुरुस्तीसह डिझाईन आणि अंमलबजावणीसाठी ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर 20 कोटी रुपयांची होती.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक