Join us

Neelam Linens IPO: ८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 1:17 PM

Neelam Linens IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे.

Neelam Linens IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा आयपीओ नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेडचा (Neelam Linens IPO) आहे. हा इश्यू ८ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि १२ नोव्हेंबरला बंद होईल. दरम्यान, या कंपनीनं आपल्या आयपीओसाठी २० ते २४ रुपये प्राईज बँड निश्चित केला आहे. १३ कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये एकूण ५४.१८ लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. यामध्ये ऑफर फॉर शेअरचा समावेश नाही.

काय आहे प्लॅन?

कंपनी आयपीओमधून जमा झालेल्या निधीचा वापर भरतकाम मशीन खरेदी सारख्या भांडवली खर्चासाठी करेल, याशिवाय काही कर्ज फेडणं आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी रक्कम वापरली जाईल. एक्स्पर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे लीड मॅनेजर आहेत, तर पूर्वा शेअर रजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहेत.

अधिक डिटेल्स

किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉट साईजसाठी अर्ज करू शकतात, ज्यात १,४४,००० रुपये किंमतीच्या ६,००० शेअर्सचा समावेश आहे. हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्तींसाठी कमीत कमी लॉट साइज दोन आहेत, ज्याची किंमत २,८८,००० रुपये आहे. आयपीओचा अर्धा भाग क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठई, १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कंपनीच्या शेअर्सचं वाटप १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सफायर लिनन्स अँड गारमेंट्सचा आयपीओ १८ नोव्हेंबर रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्म इमर्जवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

कंपनीबद्दल माहिती

नीलम लिनन अँड गारमेंट्स ही महाराष्ट्रातील सॉफ्ट होम फर्निशिंग फर्म आहे जी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये जागतिक ग्राहकांना आपली सेवा प्रदान करते. रिटेल दुकानांसाठी बेडशीट, ड्युवेट कव्हर, उशी कव्हर, टॉवेल, डोहर, रग, शर्ट आणि कपडे तयार करण्याचं काम कंपनी करत आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक