Join us  

एका दिवसात ₹१८०० नं वाढला 'हा' शेअर, दिग्गज गुंतवणूकदाराकडे आहेत ४ लाख शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:13 AM

Neuland Laboratories share return: शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीदरम्यानही फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडल्याचं दिसून आलं. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये १८०० रुपयांची वाढ झाली.

Neuland Laboratories share return: शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीदरम्यानही फार्मा क्षेत्रातील कंपनी न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडल्याचं दिसून आलं. आठवड्याच्या शेवटच्या अखेरच्या शेअरनं ११००० रुपयांची पातळी ओलांडली. ९३७३.१० रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत हा शेअर जवळपास २० टक्क्यांनी वधारला आणि किंमत ११२३९.८० रुपयांवर पोहोचली. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. त्यामुळे एका दिवसापूर्वीच्या तुलनेत हा शेअर सुमारे १८०० रुपयांनी वधारला आहे.

कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ११०७३.४० रुपयांवर बंद झाला होता. गेल्या दोन दिवसांत स्मॉलकॅप औषध कंपनीच्या शेअरमध्ये २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत हा शेअर ८३ टक्क्यांनी वधारलाय. तर, दोन वर्षांत या शेअरमध्ये ७२५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

दिग्गजांचीही गुंतवणूक

अनुभवी गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांचाही न्यूलँड लॅब्समध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं शेअरहोल्डिंग पॅटर्नच्या आकडेवारीवरून दिसून येते. जून तिमाहीअखेर कंपनीचा हिस्सा ३.१२ टक्के होता, जो ४,००,००० शेअर्स इतका होता. प्रवर्तकांचा हिस्सा ३२.७२ टक्के आणि पब्लिक शेअरहोल्डिंग ६७.२८ टक्के आहे. कंपनीबद्दल बोलायचं झालं तर, न्यूलँड लॅब्स ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे जी ग्राहकांना अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल सामग्री (एपीआय), कस्टम मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करते.

कंपनीची आर्थिक स्थिती काय?

न्यूलँड लॅब्सनं जून तिमाहीत ४४४.४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. तर करानंतरचा नफा ५८ टक्क्यांनी वाढून ९८.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ६२.२ कोटी रुपये होता. व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ हे महसुली वाढ आणि त्यानंतरचं मार्जिन सामान्य करण्याचं वर्ष असेल यावर कंपनी ठाम आहे कारण कंपनी गुंतवणूक करणं सुरू ठेवणार आहे.

जागतिक स्तरावर न्यूलँड लॅब्स ८० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून त्याच्या एकूण महसुलापैकी ७८ टक्क्यांहून अधिक उत्पन्न निर्यातीतून मिळतं. अमेरिका आणि युरोप ही त्याची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. एकूण निर्यातीपैकी हा वाटा ७९ टक्क्यांहून अधिक आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक