Join us

निफ्टी-सेन्सेक्समध्ये नवा ऑल टाईम हाय; विप्रो-पॉवर ग्रिडमध्ये तेजी, ऑटो सेक्टरमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 4:03 PM

मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजादरम्यान मोठ्या गॅपनंतरची तेजी कामकाजाच्या अखेरपर्यंत कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होऊन निर्देशांकानं नवा उच्चांक गाठला.

मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजादरम्यान मोठ्या गॅपनंतरची तेजी कामकाजाच्या अखेरपर्यंत कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होऊन निर्देशांकानं नवा उच्चांक गाठला. निफ्टीने आज २३५७९ चा नवा उच्चांक गाठला, तर सेन्सेक्सनं ७७३६७ चा नवा उच्चांक गाठला. बाजाराच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर एक रेंज तयार झाली होती, ज्यात दिवसभर बाजारात व्यवहार झाले. 

कामकाजादरम्यान आज श्रीराम फायनान्स, पॉवर ग्रिड, विप्रो, टायटन आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वधारले. तर मारुती सुझुकी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज ट्रेडिंगची सुरुवात मोठ्या गॅपसह झाली आणि निफ्टीनं २३५७१ च्या पातळीवर मोठी गॅप ओपनिंग दिली. त्याचबरोबर संपूर्ण ट्रेडिंग सेशनमध्ये बाजारात मजबूती दिसून आली आणि रेंज तयार केली. दिवसभर बाजार वरच्या पातळीवर राहिला आणि किरकोळ प्रमाणात खरेदीही दिसून आली. 

आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मंगळवारी तेजी दिसून आली. विप्रोच्या शेअरमध्ये आज व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच तेजी दिसून आली होती. आयटी क्षेत्राबरोबरच एनर्जी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येही खरेदी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार