Join us  

Nifty २५००० च्या वर बंद, सेन्सेक्समध्ये ६१२ अंकांची तेजी; IT, बँकिंग शेअरनं दिला बूस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 3:55 PM

Stock Market Closing On 26 August 2024: फेड रिझर्व्ह चेअरमन यांनी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानं भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली.

Stock Market Closing On 26 August 2024: फेड रिझर्व्ह चेअरमन यांनी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानं भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली. आयटी आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीनं बाजार उत्साह दिसून आला. 

आजच्या व्यवहारात निफ्टीने पुन्हा २५ हजारांचा ऐतिहासिक आकडा ओलांडण्यात यश मिळवलं. आजच्या व्यवहाराअखेरीस बीएसई सेन्सेक्स ६१२ अंकांनी वधारून ८१,७०० वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८७ अंकांनी वधारून २५,०१० वर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सचे ३० पैकी २१ शेअर्स वधारले आणि ९ शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीच्या ५० पैकी ३२ शेअर्स वधारले आणि १८ घसरले. एचसीएल टेक ४.०८ टक्के, एनटीपीसी ३.२९ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.७३ टक्के, टेक महिंद्रा २.४२ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील २.३८ टक्के, टायटन १.७१ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.२६ टक्के, टाटा स्टील १.२० टक्के, एल अँड टी १.०७ टक्के, टीसीएस ०.९४ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँक ०.४४ टक्के, इंडसइंड बँक ०.३६ टक्के, मारुती ०.३४ टक्के, एचयूएल ०.१९ टक्के, सन फार्मा ०.१९ टक्के, अदानी पोर्ट्स ०.१५ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार