Join us

एचयूएल-नेस्ले शेअर्सच्या विक्रीमुळे एफएमसीजी इंडेक्स १७०० अंकांनी घसरला; कुठल्या सेक्टरमध्ये तेजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 4:14 PM

Share Market Update: एचयूएल आणि नेस्लेच्या शेअर्सच्या विक्रीने बाजाराचा मूड खराब केला. ज्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले.

Share Markets : सलग चौथ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आजचा दिवसही याला अपवाद ठरला नाही. गुरुवार 24 ऑक्टोबर 2024 च्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता दिसून आली. या उलथापालथीमुळे सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाला आहे. पण आजच्या सत्रात एफएमसीजी शेअर्सला चांगलाच फटका बसला आहे. एचयूएलच्या खराब निकालाचा बाजारावर परिणाम झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरत बंद झाले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स १७ अंकांच्या किंचित घसरणीसह ८००६५ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६ अंकांच्या घसरणीसह २४,३९९ अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात, बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४३.९८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४४५.३१ लाख कोटी रुपये होते.

बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे एफएमसीजी शेअर्स. बुधवारी HUL च्या निराशाजनक निकालांमुळे निफ्टीच्या FMCG निर्देशांकात १७०० अंकांची घसरण झाली आहे. याशिवाय ऑटो, आयटी, मेटल्स, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. तेजीत असलेल्या क्षेत्रांमध्ये बँकिंग, आरोग्यसेवा आणि फार्मा क्षेत्राचा समावेश आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये पुन्हा घसरण झाली.

या शेअर्समध्ये चढउतारBSE वर ४०३३ शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यामध्ये १५८९ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि २३४४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १०४ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. बीएसईच्या ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि ११ तोट्याने बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २६ वाढीसह आणि २४ तोट्यासह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट २.७७ टक्के, टायटन १.३७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.३५ टक्के, एसबीआय १.१५ टक्के, अदानी पोर्ट्स १.०२ टक्के, पॉवर ग्रिड ०.८५ टक्के, एचडीएफसी बँक ०.८३ टक्के सन फार्मा ०.७८ टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या समभागांमध्ये एचयूएल ५.८३ टक्के, नेस्ले २.८८ टक्के, आयटीसी १.८१ टक्के, मारुती १.६१ टक्के घसरून बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक